आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपवीर यांच्या ग्रँड विवाह सोहळ्यात घागऱ्यापासून तर मंगळसूत्रापर्यंत सर्व काही होते ग्रँडच...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क- राजेशाही विवाह कशाला म्हणतात याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास नुकतेच पार पडलेले रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा विवाह. दोघांनीही त्यांच्या आवडींमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता ठेवली नाही.  विवाह सोहळ्या दरम्यान अगदी कपड्यांपासून , तर रीति रिवाज, येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत,रिसॉर्ट बुकिंग इत्यादी गोष्टींमध्ये भरमसाठ खर्च करून,कोणत्याच गोष्टीची कमतरता देखील भासू दिली नाही. दीपिकाने तर चक्क कोट्यवधींचे दागिने आणि कापडे परिधान केले होते.

 

दीपिकाने विवाह समारंभात २० लाखांचे डिझायनर मंगळसूत्र त्याचबरोबर आणखी देखील महागडे दागिने देखील परिधान केले होते. असे म्हंटले जात आहे की, तिने परिधान केलेल्या सर्व दागिन्यांची किंमत जवळपास १ कोटी रुपयां एवढी आहे.विवाहप्रसंगी दीपिकाने घातलेली रिंग तर तब्बल ३ कोटींची होती. ती तिला साखरपुड्यात देण्यात अली होती. तर रणवीर ने २०० ग्रामची अतिशय महागडी चैन विवाहप्रसंगी घातली होती.   

 

सुवर्ण तारांची होती ओढणी..
दीपिका आणि रणवीर यांचा विवाह सोहळा सिंधी रितीरिवाजात पार पडला तेंव्हा दीपिकाने घागऱ्याबरोबर परिधान केलेल्या ओढणीत तर चक्क सुवर्ण तारांचे वर्क होते. त्याचबरोबर घागऱ्याची किंमत देखील ९ लाखांच्या आसपास होती .
     
माध्यमांच्या अहवालानुसार या सोहळ्या दरम्यान रणवीर आणि दीपिका यांच्या व्यतिरिक्त इतर पाहुणे मंडळींसाठी ब्लेविओ याठिकाणी एक आलिशान रिसॉर्ट बुक करण्यात आले होते.येथील एका खोलीचे प्रतिदिवसाचे भाडे कमीत कमी 400 युरो म्हणजेच 33,000 च्या आसपास आहे. असे दीपिका आणि रणवीरने 75 खोल्यांचे बुकिंग याठिकाणी केले होते. आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्याकरिता त्यांनी प्रतिदिन 24,75,000 तर आठवड्यात जवळपास 1 कोटी 73 लाख 25 हजार एवढा खर्च फक्त रिसॉर्ट वर केला होता.

 

४ कोटींची घेतली बोट
नवविवाहित दांपत्य दीपिका आणि रणवीर यांनी इटली मध्ये रॉयल विंटेज नावाची बोट घेतली होती.माध्यमांच्या अहवालानुसार वारपक्षाच्या आगमनासाठी घेण्यात आलेल्या बोटीची किंमत तर तब्बल ४ कोटींएवढी होती.


खर्च तर आणखी आहेतच....
विवाह समारंभात केले गेलेले हे ते खर्च आहेत ज्यांचि माहिती बाहेर आली, याव्यतिरिक्त येण्या जाण्यासाठी लागणार खर्च, दोन रितीरिवाजात पार पडलेल्या सोहळ्याचा खर्च, भव्य दिव्य आकर्षक सजावट, खाणे पिणे याचबरोबर इतर आणखीनही नियोजित कार्यक्रमांवर केलेला खर्च त्यांचा तर हिशोबच नाही.  

 

रिसेप्शन तर आणखी बाकीच आहे.....
आठवडाभर चाललेल्या याविवाह सोहळ्या दरम्यान दीपिका आणि रणवीरने भरमसाठ पैसे खर्च केले. हा समारंभ केवळ कौटुंबिक सदस्य आणि नातेवाईकांसाठी होता. अजून तर  ग्रँड रिसेप्शन बाकीचं आहे. असे म्हंटले जाते की, २१ नोव्हेंबर रोजी हे नवदांपत्य नातेवाईकांसाठी बंगरुळु येथील लीला पॅलेस येथे भव्य दिव्य रिसेप्शन ठेवणार आहेत या रिसेप्शनसाठी दिपवीर मंगळवारी मुंबईहून बेंगळुरू येथे रवना होतील. त्यानंतर दुसरे रिसेप्शन २८ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होणार आहे. यामध्ये सर्व माध्यम प्रतिनिधी असतील तर १ डिसेंबर रोजी होणाऱ्या रिसेप्शन मध्ये सर्व  बॉलीवुड सेलिब्रेटी उपस्थित असतील माध्यमाच्या अहवालानुसार हे रिसेप्शन मुंबई येथील फाईव्हस्टार हॉटेल ग्रँड हयात मध्ये होईल. विवाह सोहळ्यासाठी कोट्यवधी खर्च केले तर येथे तर सेलिब्रेटी येणार म्हणल्यावर कोणत्याच गोष्टीची कमतरता राहणार नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...