आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, दीपिका रणवीर शादी, Deepika Padukone Ranveer Singh Sister In Laws Do You About Them

दीपिकाची नणंद सर्वांसमोर म्हणाली होती \'बॅड गर्ल\', अनेक वर्षांपासून एकमेकांशी बोलत नाहीत, नणंद-भावजयीतील भांडणाची ही आहेत 3 कारणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बुधवारी विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनीही कोकणी पद्धतीने लग्न केले आहे. या विवाहानंतर दीपिकाचे अनेक बॉलीवूड स्टार्ससोबत नातेसंबंध जोडले गेले आहे. पण दीपिकाचे तिच्या एका नणंदेसोबत अजिबात जमत नाही. दोघाींमधील हे भांडण आताचे नसून 11 वर्षांपूर्वीचे आहे.   

 

कारण क्रमांक 1

> सोनम कपूर आणि रणवीर सिंगची यांचे कझीनचे नाते आहे. सोनमची आई सुनीता कपूर आणि रणवीरचे वडील जगजीत सिंग भवनानी हे चुलत भाऊ आहेत. सोनम आणि दीपिका यांच्यातील संबंध कधीही सामान्य राहिले नाही. दोघांच्या भांडणाची सुरूवात 2007 मध्ये झाली. दोघांनीही त्याचवर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या 'सांवरिया' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले होते तर फराह खान यांच्या 'ओम शांती ओम' मध्ये दीपिका पदुकोण प्रथमदर्शी झळकली होती. दोन्ही चित्रपट 9 नोव्हेंबर 2007 रोजी प्रदर्शित झाले होते. दोन्ही चित्रपटांच्या क्लॅशमुळे दोघींमध्ये मतभेद निर्माण झाले.

 

कारण क्रमांक 2
> 'सांवरियाँ' चित्रपटाच्यावेळी रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांचे अफेयर असल्याची चर्चा झाली होती. पण लवकरच रणबीर आणि दीपिकाच्या अफेयरच्या बातम्या समोर आल्या. या कारणास्तव दीपिका आणि सोनम यांच्यात कडूपणा निर्णाण झाला होता. पण 2009 मध्ये रणबीरने कॅटरीना कैफसाठी दीपिकाला फसवले. यानंतर रणबीरच्या दोन्ही एक्स-गर्लफ्रेंड्स सोनम आणि दीपिका यांच्यात मैत्री झाली होती.

 

कारण नंबर 3
> जेव्हा सोनमला वाटले की दीपिका पीआर एजन्सीद्वारे तिच्याविरूद्धची स्टोरी बनवत आहे तेव्हा त्यांना दोघींच्या मैत्रीमध्ये पुन्हा एकदा दरी निर्माण झाली. त्या दोघींचे पीआर एजन्सी एकच होती. अनेक रिपोर्ट्समध्ये, असे छापून आले की, सोनमला तेच चित्रपट आणि जाहिराती मिळत आहेत जे दिपीकाने नाकारले होते. त्यानंतर सोनमने दीपिकासाठी काम करणारी पीआर एजन्सी सोडली.

 

सोनमने दीपिकावर साधला निशाणा
> 2010 मध्ये दीपिका आणि सोनम 'कॉफी विथ करन' कार्यक्रमामध्ये एकत्र आले होते. पण येथेही त्यांच्यातील मतभेद पाहण्यात आले होते. "ती कोण चांगली मुलगी आहे जी आता बॅड गर्ल झाली आहे?" असे करण जोहरने सोनमला विचारताच, सोनमने दीपिकाचे नाव घेतले होते. एवढंच नाही तर, करणने जेव्हा विचारले की, दीपिकाला कोणता सल्ला देण्यास इच्छूक आहे, तेव्हा सोनमने सांगितले ही "दीपिकाने आपली स्वतःची शैली बनवावी. कतरीनाची तिचा स्वत:ची शैली आहे. अन्य कोणाच्या साच्यामध्ये स्वत:ला बसवण्याचा प्रयत्न करीत नाही. म्हणूनच मी तिचा सम्मान करते. तेव्हापासून दोघांना एकमेकांशी बोलणे आवडत नाही.


मेहूणीसोबत आहे रणवीरची चांगली बाँडींग
> दीपिकाचे तिच्या नणंद सोबत जमत नसले तरी रणवीरचे मात्र त्याची मेहूणी अर्थात दिपीकाची बहिण अनीशा सोबत चांगले बाँडिंग आहे. दोघेही बहिणींसाठी रणवीर फोटोग्राफर बनला आहे. काही महिन्यांपूर्वी दिपीकाने तिच्या Instgram वर एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये लिहीले होते 'me and my little...coz sisters are the bestest!!! Photo credits:@ranveersingh'. 

 

बातम्या आणखी आहेत...