आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मी 9 चित्रपटांमध्ये ऐश्वर्यासोबत काम केले, 8 पेक्षा जास्तमध्ये तिला जास्त पैसे मिळाले\' - अभिषेक बच्चन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. बच्चन कुटूंबातील सर्वच लोक स्टार्स आहेत. बॉलिवूडमध्ये बच्चन कुटूंब हे महत्त्वाचे मानले जाते. बिग बी आणि जया बच्चनसोबतच त्यांच्या कुटूंबातील ऐश्वर्या रायची गणनाही सुपरस्टारमध्ये केली जाते. अभिषेक बच्चननेही हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याला बायको ऐश्वर्यापेक्षा चित्रपटांमध्ये कमी पैसे मिळायचे. अभिषेक बच्चनने आपल्या पत्नीसोबत जवळपास 9 चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामधून 8 चित्रपटात ऐश्वर्याला ज्यूनियर बच्चनपेक्षा जास्त फीस मिळाली आहे. नुकत्या दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने ही गोष्ट उघड केली.


त्याने मुलाखतीत सांगितले की, - 'पीकू' चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इरफान पठानसारखे स्टार्स असूनही दीपिका पदुकोणला जास्त फीस मिळाली होती. तो म्हणाला की, हा एक प्रकारचा बिझनेस आहे आणि ज्या स्टार्सची डिमांड जास्त असते त्यांना त्याप्रमाणे फीस मिळते.

 

या चित्रपटात अभिषेक-ऐश्वर्याने केले एकत्र काम 
अभिषेक आणि ऐश्वर्याने 'कुछ न कहो', 'ढाई अक्षय प्रेम के', 'गुरु', 'धूम 2', 'रावण', 'हैप्पी एनिवर्सरी', 'उमराव जान', 'बंटी और बबली', 'सरकार राज' मध्ये एकत्र काम केले आहे. 'गुलाब जामुन' हा दोघांचा आगामी चित्रपट आहे.

 

ज्यूनियर बच्चनपेक्षा श्रीमंत आहे पत्नी ऐश्वर्या 
- अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नेटवर्थविषयी बोलायचे झाले तर ऐश्वर्या पतीपेक्षा पुढे आहे. ऐश्वर्याची नेटवर्थ 259 कोटी रुपये आहे. तर अभिषेकची नेटवर्थ 222 कोटी रुपये आहे. (networthier.com नुसार) 
- अभिषेकजवळ चित्रपट कमी असले तरी तो कबड्डी टीम आणि फुटबॉल टीमचा ओनर आहे. यासोबतच अनेक ब्रांडचा एंडोर्समेंट करतो. यावर्षी अभिषेकचा 'मनमर्जिया' चित्रपट आला पण तो बॉक्सऑफिसवर जास्त दिवस हिट होऊ शकला नाही.
- ऐश्वर्या चित्रपटांसोबतच अनेक ब्रांड एंडोर्समेंट करते. ऐश्वर्या रायचा 'फन्ने खां' याचवर्षी आला होता. पण चित्रपट काही खास जादू दाखवू शकला नाही.
 

 

 

बातम्या आणखी आहेत...