आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाच्या वडिलांनी धुतले रणवीरचे पाय, कोंकणी पध्दतीने झाला दीपवीरचा साखरपुडा, सेरेमनीमधील हा फोटो आला समोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या लग्नाविषयी सर्वांना उत्सुकता आहे. प्रत्येकाला त्यांच्या लग्नासंबंधीत बातम्या जाणुन घ्यायच्या आहेत. लग्नापुर्वीची फूल मुडीची प्रथा पुर्ण झाली आहे. कोंकणी ट्रेडिशनल इंगेजमेंट सेरेमनीला फूल मुडी म्हटले जाते. तर इटलीच्या लेक कोमोमध्ये दीपवीरच्या लग्नाचे फंक्शन्स सुरु झाले आहेत. रिपोर्ट्नुसार दीपवीरची मेंदी आणि संगितच्या विधी सुरु झाल्या आहेत.

 

ऑफिशियली एंगेज झाले दीपवीर 
- फूल मुडी सेरेमनीदरम्यान दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोणने होणा-या जावयाचे पाय धुतले.
- सेरेमनीनंतर दीपिका आणि रणवीरने एकमेकांना रिंग घातली. सेरेमनीपुर्वी रणवीर आपल्या कुटूंबासोबत एंगेजमेंट वेन्यूवर पोहोचला तर दीपिकाच्या पालकांनी त्यांचे स्वागत केले. शगुण म्हणून नारळही दिले. 

 

दीपवीरला लागली मेंदी 
दीपिका आणि रणवीरची मेंदी आणि संगित सेरेमनी इटलीच्या लेक कोमोमध्ये सुरु झाली आहे. रिपोर्ट्सनुसार दीपिकाला मेंदी लावल्यानंतर धमाकेदार संगीत सेरेमनीला सुरुवात झाली आहे. लग्नात सहभागी झालेल्या पाहुण्यांनी  'मेहंदी नी मेहंदी..', 'काला शाह काला..', 'मेहंदी है रचने वाली..'सारख्या गाण्यांवर डान्स केला. तर रणवीर 'तुने मारी एंट्री...' सारख्या गाण्यावर डान्स करणार आहे. 


- दीपिकाची स्टायलिश शलीना लथानीने काही फोटोज शेअर केले. यामध्ये दीपिकाचे फिटनेस ट्रेनर आणि हेयर स्टायलिश दिसत आहेत. हे दोघं मेंदी आणि संगीत सेरेमनीसाठी तयार झाले आहेत असे मानले जातेय. फोटोमध्ये दीपिकाचे ट्रेनर नम हे व्हाइट कुर्ता-पायजामामध्ये दिसत आहेत. तर हेयर स्टायलिश  Gabriel आराम करताना दिसत आहे. 


- संगीत सेरेमनीमध्ये बॉलिवूडचे सिंगर आपले परफॉर्मेन्स देत आहेत. सिंगर हर्षदीप कौर, म्यूझिशियन संजोय दास, बॉबी पाठक आणि फिरोज खान इटलीमध्ये आहेत.
- टाइट सिक्योरिटी असूनही दीपवीरच्या लग्नाच्या बातम्या आणि फोटोज वेन्यूवरुन लीक होत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...
 

बातम्या आणखी आहेत...