आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका-रणवीरच्या लग्नात असतील फक्त 30 पाहुणे, कुणालाही फोटो घेण्यास परवानगी नाही, लेक कोमोमध्ये वाढली सुरक्षा, लग्न होईपर्यंत टुरिस्टवर बॅन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह येत्या 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध होणार आहेत. दोन पद्धतीने त्यांचे लग्न होणार आहे. लग्न अतिशय खासगी ठेवण्यात आले आहे. बातम्यांनुसार, दीपिका-रणवीरच्या लग्नात अवघे 30 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांमध्ये कुणीही फिल्म इंडस्ट्रीतील नाही. दोघांच्या लग्नात अपरिचित व्यक्ती दाखल होऊ नये यासाठी तीन स्तरावर सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

पब्लिकसाठी बंद झाले लेक कोमो...
दीपिका-रणवीरचे लग्न इटलीतील लेक कोमोस्थित वेल डेला येथा होणार आहे. लग्नासाठी सामान्यांना तेथे बॅन करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे सर्व फंक्शन संपेपर्यंत सामान्य पर्यटकांना लेक कोमो आणि विशेषतः विल डेला येथे येण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.

 

पाहुणे क्लिक करु शकणार नाहीत दीपिका-रणवीरच्या लग्नाचे फोटो..

दीपिका-रणवीरच्या लग्नाचे फंक्शन कसे असतील, याची माहिती उघड झालेली नाही. रणवीरची स्टायलिस्ट निताशा गौरव हिने ट्वीट केले, 'No pictures but it was love personified to see them together today. Couldn’t stop my tears, but these were tears of happiness and so I hope they never do'.

 

दीपिका - रणवीरने केले लग्नाच्या फंक्शनचे इंश्योरन्स..
या लग्नात कोट्यवधी रुपये खर्च होणार आहे. प्रत्येक गोष्ट प्लाननुसार होणार आहे. पण तरीदेखील खबरदारी म्हणून रणवीर-दीपिका यांनी त्यांच्या लग्नाचा इंश्योरन्स केला आहे. हा वीमा चार दिवसांचा करण्यात आला आहे. 12 ते 16 नोव्हेंबरपर्यंतच्या कार्यक्रमांसाठी वीमा काढण्यात आला आहे. ओरिएंटल इंश्योरन्स कंपनीचा वीमा असून याच्या रक्कमचा खुलासा झालेला नाही.

 

संगीत सेरेमनीसाठी बॉलिवूडमधून पोहोचले गायक... 

- दीपिका रणवीरच्या संगीत सेरेमनीत बॉलिवूड सिंगर्स परफॉर्म करणार आहेत. सिंगर हर्षदीप कौर, म्युझिशियन संजोय दास, बॉबी पाठक आणि फिरोज खान इटलीत दाखल झाले आहेत.  संजोय दास यांनी त्यांच्या ट्वीटरवर याची माहिती देताना स्पेशल फंक्शनसाठी मिलानला पोहोचल्याचे सांगितले आहे. तर हर्षदीपनेही फ्लाइटमधील तिचा एक सेल्फी शेअर केला आहे.

- दीपिका रणवीरचे लग्न दोन पद्धतीने होणार आहे. कोंकणी पद्धतीने होणा-या लग्नात दीपिका व्हाइट आणि गोल्डन कलरची साडी परिधान करणार आहे. तर सिंधी पद्धतीने होणा-या लग्नात दीपिका गुलाबी रंगाचा लहेंगा तर रणवीर कांजीवरम शेरवानी घालणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...