आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Padukone Ranveer Singh Wedding Unseen Photo: Couple Poses With Cook Caterers And Security Guard In Wedding

Unseen Photo मधून दिसतो दीपवीरचा मोठेपणा, कुक-वेटरपासून पंडित-सिक्योटी गार्डपर्यंत सर्वांसोबत काढले नातेवाईकांप्रमाणे फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या लग्नाचा एक अनसीन फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये कपल लग्नादरम्यान वेडिंग स्टाफसोबत पोज देताना दिसत आहे. हे कपल लग्नाचे अरेंजमेंट करणा-या केटरर्ससोबत आनंदात पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये कुक, वेटर, पंडित, सिक्योरिटी गार्ड आणि अरेंजमेंट करणारे लोक एकत्र पोज देताना दिसत आहेत. दीपवीर किती डाउन टू अर्थ आहे हे या दोघांच्या फोटोवरुन दिसते. 


दीपिकाला आवडला नणंदेचा लूक
- बेंगळुरुमध्ये दीपिकाचे पहिले रिसेप्शन झाले. यावेळीचा रितिका भवनानीचा फोटो व्हायरल होत आहे. रणवीरची बहिण रितिका फंक्शनमध्ये एकदम रॉयल लूकमध्ये दिसतेय. 
- रितिकाने ब्लू, ब्लॅक अँड रेड कलरचा हेवी गाउन घातला होता. रोहित बहलने हा डिझाइन केला होता. आउटफिटसोबत तिने ट्विस्टेड जूडा आणि सुंदर झुमके घातले होते.

- रितिका या लूकमध्ये खुप सुंदर दिसत होती. दीपिकालाही तिचा हा लूक खुप आवडला. 


दीपवीरच्या लग्नाचे अजून 2 ग्रँड रिसेप्शन होणार 

- 21 नोव्हेंबरला बेंगळुरु रिसेप्शननंतर 28 नोव्हेंबरला रणवीरचे पालक अजून एक रिसेप्शन होस्ट करणार आहे. हे रिसेप्शन रणवीरचे कुटूंब, फ्रेंड्स, मीडिया आणि जवळच्या नातेवाईकांसाठी असणार आहे. 
- यानंतर दीपवीर आपल्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन मुंबईमध्येच 1 डिसेंबरला आयोजित करणार आहेत. हे रिसेप्शन द ग्रँड हयात हॉटेलमध्ये रात्री 9 वाजता सुरु होईल. ही पार्टी बॉलिवूड स्टार्ससाठी असणार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...