आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर सिद्धीविनायकाच्या दर्शनाला पोहोचली दीपिका-रणवीर, सोबत होते संपूर्ण कुटुंब, व्याहींमध्ये दिसली चांगली बाँडिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः लग्नानंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी दोघांनी बाप्पाचा आशीर्वाद घेतला. दीपवीरसोबत त्यांचे संपूर्ण कुटुंबीय मंदिरात पोहोचले होते. यावेळी रणवीर आणि दीपिका क्रीम कलरच्या ड्रेसमध्ये स्पॉट झाले. रणवीरने क्रीम कलरच्या कुर्ता-पायजामासोबत जॅकेट कॅरी केले होते. तर दीपिका क्रीम कलरच्या सलवार-सूटमध्ये दिसली. दीपिकाच्या गळ्यात मंगळसूत्र, भांगात कुंकू आणि हातात लाल चुडा होता. नवविवाहितेच्या रुपात ती अतिशय सुंदर दिसली.


चाहत्यांची जमली गर्दी...
- दीपिका आणि रणवीर त्यांच्या कुटुंबीयांसोबत मंदिरात पोहोचल्यानंतर त्यांची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांची तेथे गर्दी जमली होती. यावेळी गर्दीला आवरणे पोलिसांना कठीण गेले होते. 

 

- बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर दीपवीरने मीडिया फोटोग्राफर्सना पोज दिली. 


- यावेळी दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण, आई उज्ज्वला आणि बहीण अनीशा यांच्यासह रणवीरचे वडील जगजीत सिंह भवनानी, आई अंजू आणि बहीण रितिका मंदिरात आले होते. दीपिका आणि रणवीर यांच्या वडिलांमध्ये यावेळी खास बाँडिंग बघायला मिळाली. 

 

मी तर भटकत राहिलो असतो - रणवीर
रणवीरने अलीकडेच फिल्मफेअर मॅगझिनच्या डिसेंबर महिन्याच्या अंकासाठी फोटोशूट केले आहे. फोटोशूटसोबतच त्याने दीपिकासोबतची त्याची लव्ह स्टोरीही मुलाखतीत शेअर केली. रणवीरने मुलाखतीत सांगितले, 'मला तीन वर्षांपूर्वीच दीपिकासोबत लग्न करायचे होते, पण मी फक्त तिच्या होकाराची प्रतिक्षा करत होतो. तिचा होकार येताच लग्न करण्याचा मी निर्णय घेतला होता. दीपिका मला मिळाली नसती, तर मी भटकत राहिलो असतो. तिने मला कायम प्रोत्साहन दिले आहे.' दीपिकाच्या इच्छेनुसारच भारताबाहेर जाऊन लग्न थाटल्याचे या मुलाखतीत रणवीरने सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...