आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Padukone Revealed Depression Has Struck Her Again During Filming Chhapaak

'छपाक'च्या शूटिंग दरम्यान पुन्हा डिप्रेशनमध्ये होती दीपिका, म्हणाली- सेटवर समुपदेशकाची गरज पडली होती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो क्रेडिट- यूट्यूब (चॅनेल: राजीव मसंद) - Divya Marathi
फोटो क्रेडिट- यूट्यूब (चॅनेल: राजीव मसंद)

बॉलिवूड डेस्कः दीपिका पदुकोणने अलीकडेच एका मुलाखतीत एक मोठा खुलासा केला. तिने सांगितल्यानुसार, दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या 'छपाक' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती पुन्हा डिप्रेशनमध्ये गेली होती. चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांच्याशी झालेल्या संभाषणात तिने खुलासा केला की, चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना तिला पूर्ण वेळ तिच्या समुपदेशकाची गरज पडली होती.

हा अनुभव सांगताना दीपिका म्हणाली, "मला चित्रपटाच्या सेटवर माझ्या समुपदेशकाची गरज पडली होती. मी नैराश्यात जात असल्याचे मला जाणवू लागले होते. मला वाटले की कदाचित मी थकले आहे किंवा असे वाटते की मी जास्त काळ काम करत आहे." पण नंतर परिस्थिती बिकट झाली आणि मला 'क्लॉस्ट्रोफोबिक' वाटू लागले. 'क्लॉस्ट्रोफोबिया' म्हणजे फोबियाचा एक प्रकार ज्यामध्ये माणूस स्वतःला एका छोट्या खोलीत बंदिस्त वाटतो. माझ्यासाठी हे पात्र भावनिकदृष्ट्या खूप कठीण होते. त्या दिवसांबद्दल (जेव्हा लक्ष्मी अग्रवालवर अ‍ॅसिड हल्ला झाला होता) विचार करणे आणि स्वत: ला तिथे भावनिक ठेवणे मला सोपे नव्हते. "

  • त्याच वेळी लग्नाची तयारीही सुरू होती

दीपिकाने 2018 च्या सुरूवातीस 'छपाक' ची तयारी सुरू केली. याच वेळी रणवीर सिंगसोबत तिच्या लग्नाची तयारी चालू होती. ती म्हणते, "सुरुवातीला हे खूपच गुंतागुंतीचे होते आणि त्यात इमोशन नव्हते.. आम्ही हा चित्रपट करणार आहोत हे ठरवल्यानंतर लगेच प्रोस्थेटिक्सवर काम करण्यास सुरवात केली. कारण नंतर लग्नामुळे मी सुटी घेतली होती."

  • ... आणि मेघना म्हणाली हाच तर चित्रपट आहे

दीपिका म्हणाली, "आम्ही बर्‍याच लुक टेस्ट केल्या. मी माझ्या स्वत: च्या वेगाने जात होते. पण जेव्हा शेवटची टेस्ट झाली तेव्हा ती प्रत्यक्षात बदलली. त्यादिवशी माझा चित्रपटातील चेहरा समोर आला आणि मी मेघनाला सांगितले की, मला माझ्यासारखेच वाटत आहे. त्याला उत्तर म्हणून ती म्हणाली - हाच तर चित्रपट आहे. "

  • लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर बेतली आहे चित्रपटाची कहाणी

'छपाक'ची कथा दिल्लीतील लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर बेतली आहे. तिच्यावर 2005 मध्ये अ‍ॅसिड हल्ला झाला होता. त्यावेळी लक्ष्मी 15 वर्षांची होती. दीपिका लक्ष्मीवर आधारित मालतीची व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटात विक्रांत मैसीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होईल आणि अजय देवगण स्टारर फिल्म 'तानाजी: द अनसंग वॉरियर' आणि रजनीकांत स्टारर फिल्म 'दरबार' यांच्याशी स्पर्धा करेल.

बातम्या आणखी आहेत...