• Home
  • Bollywood
  • News
  • Deepika Padukone Romi Dev First Look Latest Picture Updates On Ranveer Singh Kapil Dev Biopic 83

 फर्स्ट लुक / कपिल देवनंतर आता रोमी देवचा लूक झाला रिव्हील, '83'मध्ये या रुपात दिसणार आहे दीपिका पदुकोण

‘83’ तील दीपिकाचा फर्स्ट लूक लाँच 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 19,2020 02:16:13 PM IST


बॉलिवूड डेस्कः रणवीर सिंहच्या आगामी ‘83’ चित्रपटात दीपिका पादुकोण कपिल देवची पत्नी रोमीची भूमिका साकारत आहे. आतापर्यंत चित्रपटातील सर्वच कलाकारांचा लूक समोर आला होता. रणवीर तर हुबेहुब कपिल देव यांच्यासारखा दिसतोय. फक्त दीपिका पदुकोणचा लूक रिव्हील करण्यात आला नव्हता. आता चित्रपटातील दीपिकाचा लूकही समोर आला आहे. तिचा हा लूक बुधवारी रिलीज करण्यात आला.

चित्रपटातील भूमिकेविषयी दीपिका म्हणते, ‘भारतीय खेळाच्या इतिहासात सर्वात महान क्षणापैकी एकावर आधारित या चित्रपटात एक छोटा मात्र महत्त्वपूर्ण भूमिका साकारणे माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे. एका पतीच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक यशामध्ये पत्नीची काय भूमिका असते हे मी जवळून आईच्या रूपात पाहिले आहे. ज्या महिला आपल्या स्वप्नांपेक्षा पतीच्या स्वप्नांना जगतात, त्यांना साथ देतात, अशा महिलांना माझा हा चित्रपट समर्पित आहे.'

दुसरीकडे दीपिकाच्या निवडीबाबात कबीर सांगतात, 'मी दीपिकाला एक उत्कृष्ट अभिनेत्रीच्या रूपात पाहतो. मी जेव्हा रोमी देव यांच्या भूमिकेसाठी विचार करत होतो, तेव्हा माझ्या डोक्यात एकच नाव होते. ते फक्त दीपिकाचे. रोमी खूपच सकारात्मक आहेत आणि दीपिकाने त्या भूमिकेला न्याय दिला. रणबीरसोबत तिची केमिस्ट्री पाहण्याजोगी आहे.'

X