आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचे लग्न आणि बेंगळुरुमध्ये दिलेल्या पहिल्या रिसेप्शनच्या चर्चा सध्या बॉलिवूड विश्वात सुरु आहे. या दोन्हीही फंक्शनमध्ये दीपिकाने नेसलेल्या साड्यांवर सर्वांचे लक्ष होते. दीपिकाने कोंकणी लग्नात रेड कलरची हँडलूम आणि बेंगळुरु येथील रिसेप्शनमध्ये गोल्डन कलरची सिल्क हँडलूम साडी नेसली होती. या साड्या दीपिकाच्या आईने बेंगळुरु येथील एका शोरुममधून खरेदी केल्या होत्या. विशेष म्हणजे हे शोरुम 600 वर्षे जुने आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही येथील रेग्यूलर कस्टमर होत्या. इंदिरा गांधी येथील हँडलूम साड्या नेसायच्या आणि येथे त्यांच्यासाठी विशेष साड्या बनवल्या जात होत्या. यासोबतच आमिर खानच्या आई जीन हुसैन, पत्नी किरण राव, नरगिस दत्त, वैजयंती माला, सिंगर कविता कृष्णमूर्ती, प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा, रेखा, करीना कपूरची सासू शर्मिला टागोर, श्रीदेवी, एमएस सुब्बालक्ष्मीही या शोरुमच्या रेग्यूलर कस्टरम होत्या. बेंगळुरु येथील या नामांकित शोरुमचे नाव 'द हाउस ऑफ अंगदी' असे आहे. सूत्रांनुसार शोरुमने दीपिकाचे लग्न आणि रिसेप्शनसाठी विशेष साड्या डिझाइन केल्या होत्या. दीपिकाच्या ब्रायडल लूकवर आकर्षित होऊन अनेक लोक आता तिच्या साडीसारखी साडी खरेदी करत आहेत. आता या शोरुममधून ही साडी आउट ऑफल स्टॉक झाली आहे.
कामावर परतला रणवीर
- 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीमध्ये रणवीर-दीपिकाने कोंकणी आणि सिंधी पध्दतीने लग्न केले. नंतर कपलने भारतात येऊन 21 नोव्हेंबरला बेंगळुरुमध्ये रिसेप्शन दिले. यानंतर रणवीर तात्काळ कामात व्यस्त झाला आहे.
- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणवीरचे शेड्यूल खुप व्यस्त होते.. हा चित्रपट भारत आणि विदेशात बॅक टू बॅक शूट केला गेला होता. आता चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होण्यासाठी तयार आहे. मेकर्सजवळ पोस्ट प्रोडक्शन कम्पीट करण्यासाठी वेळ नाही. यामुळे रणवीर मुंबईमध्ये परत येताच यशराज स्टूडियोमध्ये डबिंगसाठी जाताना स्पॉट झाला. चित्रपटाचे क्रू मेंबर्सही पोस्ट प्रोडक्शनवर मेहनत करत आहेत. कारण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.
मुंबई रिसेप्शननंतर लान्च होणार ट्रेलर
दीपिका आणि रणवीरच्या मुंबई रिसेप्शनच्या तात्काळ नंतर सिम्बा चित्रपटाचा ट्रेलर लान्च होणार आहे. यानंतर रणवीर चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करु शकतो. तो अनेक रिअॅलिटी शोजमध्ये उपस्थित राहिल, यासोबतच मीडियासोबत बातचित करताना दिसेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.