आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : दीपिका पदुकोण 33 वर्षांची झाली आहे. 5 जानेवारी 1986 ला कोपेनहेगेन, डेनमार्कमध्ये जन्मलेली दीपिका डिप्रेशनचा सामना करत असलेल्या लोकांची मदत करण्यासाठी लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशन (The Live Love Laugh Foundation) चालवते. 2014 मध्ये तिने या फाउंडेशनची सुरुवात केली होती. पण तुम्हाला माहित आहे का की दीपिकाच्या कामामागे तिच्या दुःखद भूतकाळाचा खूप मोठा हात आहे. झाले असेव्ही होते, दीपिका स्वतःही कधीतरी खूप डिप्रेशनमध्ये होती. स्वतः दीपिकाने एका इंटरव्यूदरम्यान आपली हि दुःखद गोष्ट सांगितली होती.
दीपिकाने म्हणाली होती - ब्रेकअपनंतर ती पुरती कोलमडून गेली होती...
दीपिकाने इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, ती रणबीर कपूरसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर पूर्णपणे किलमधून गेली होती. टिकची रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती. एवढेच नाही तर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. दीपिकाने हेदेखील सांगितले की एकटे राहण्याची वेळ पडू नये म्हणून तिने स्वतःला कामात पूर्णपणे व्यस्थ करून घेतले होते. ती पुढे म्हणाली, "ते नाते तुटल्यावर मला कळले की मला कोणत्याही माणसासोबत इतके अटॅच व्हायला नको होते. ब्रेकअपनंतर मी खूप रडले होते, पण त्यानंतर मी खूप चांगली व्यक्ती बानू शकले, यासाठी त्याचे धन्यवाद"
रणबीरने केला होता दीपिकाचा विश्वासघात...
दीपिका पादुकोणने रणवीर सिंहसोबत आता लग्न केले आहे. दोघे जवळ-जवळ 6 वृक्ष एकत्र होते. पण रणवीर सिंहचेअगोदर तिचे सर्वात चर्चेत असलेले अफेयर रणबीर कपूरसोबत होते. हे दोघे फिल्म 'बचना ए हसीनों' च्या सेटवर जवळ आले होते. पण लवकरच दोघांचे ब्रेकअप झाले. म्हंटले जाते की, रणबीरने कतरिना कैफसाठी दीपिकाचा विश्वासघात केला होता.
दीपिकाने रणबीरला रंगे हाथ पकडले होते...
स्वतः दीपिकानेही एका इंटरव्यूदरम्यान रणबीरशी झालेल्या ब्रेकअप मागचे कारण सांगितले होते. ती म्हणाली होती, "मला मूर्ख बनवले जात होते, मी अशा रिलेशनशिपमध्ये का होते ? यापेक्षा चांगले ठरत हे होते की मी राहावे आणि मजा करावी. पण आधीपासून हे कुणाला माहित असते. सगळे मला सांगत होते की, तो तुला फसवत आहे. पण मी कोणाचेही ऐकले नाही. मग मी त्याला रंगे हाथ पकडले. यातून बाहेर पडायला मला थोडा वेळ लागला. पण मी जे पहिले त्यानंतर परतण्यासारखे काहीच उरले नव्हते"
दीपिका "मला फसवले तेव्हा मला वाटले की आमच्या नात्यात काहीतरी चुकते आहे. पण जेव्हा ही सवय बनते तेव्हा समजून जायला हवे की, समोरच्याचीच चूक आहे. मी रिलेशनशिप्समध्ये खूप काही दिले. पण त्याबदल्यात काहीही अपेक्षा नव्हती ठेवली. पण जेव्हा आदरच राहत नाही, विश्वास राहत नाही, जे सर्वच नात्याचा आधारस्तंभ असतात, तेव्हा त्या नात्यात कुणीच राहू शकत नाही"
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.