आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातात दारूचा ग्लास घेऊन पती रणवीरच्या फिल्मचा डायलॉग बोलताना दिसली दीपिका पदुकोण, स्वतः रणवीरने शेयर केला व्हिडीओ 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचा लग्नाला आता 2 महिने होत आले आहेत. त्यांनी 14-15 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमोमध्ये लग्न केले. यादरम्यान, दीपिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जॅमध्ये ती मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका हातात दारूचा ग्लास घेऊन पती रणवीरच्या फिल्म 'सिम्बा' च एक डायलॉग बोलत आहे. दीपिका म्हणते, 'ऐ आया पुलिस...' दीपिकाचा हा व्हिडीओ आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स, हा रणवीरचा इफेक्ट आहे असे सांगत आहेत. एका यूजरने लिहिले, 'हा रणवीरचा इफेक्ट आहे' तर दुसऱ्या यूजरने लिहिले, भवनानी इफेक्ट दिसत आहे. 

 

दीपिकाचा हा व्हिडीओ स्वतः रणवीर सिंहने सोशल मीडियावर शेयर केला आहे. रणवीरने दीपिकाचा हा व्हिडीओ शेयर करत लिहिले, 'माय चीयरलीडर'. रणवीरची 'सिम्बा' बॉक्स ऑफिसवर 200 कोटी क्लबमध्ये सामील करून घेतले आहे. आणि यांनंतरही फिल्म चांगली कमाई करत आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या जोडीने आत्तापर्यंत 3 सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये 'गोलियों की रास लीला : रामलीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' असे चित्रपट सामील आहेत. 

 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणवीर सिंह लवकरच फिल्म 'गली ब्वॉय' मध्ये दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत आलिया भट काम करत आहे. यानंतर तो फिल्म '83' मध्ये कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तसेच दीपिका पदुकोण असिड अटॅक सर्वाइवर लक्ष्मी अग्रवाल यांच्या लाइफवर बेस्ड फिल्म 'छपाक' मध्ये दिसणार आहे. ही फिल्म मेघना गुलजार प्रोड्यूस करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...