आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Padukone Starrer 'Chhapaak' In Controversy, A Writer Approached The Bombay High Court Against The Film

रिलीजच्या दोन आठवड्यांपूर्वी दीपिकाच्या चित्रपटावर कथा चोरीचा आरोप, लेखकाने हायकोर्टात दाखल केली याचिका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री दीपिका पदुकोण स्टारर 'छपाक' चित्रपट प्रदर्शानाच्या दोनच आठवड्यांपूर्वी वादात सापडला आहे. राकेश भारती नावाच्या लेखकाने निर्मात्यांवर या  चित्रपटाची कथा चोरी केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अ‍ॅसिड अ‍टॅक सर्व्हायव्हरच्या ज्या कथेवर चित्रपट आधारित आहे, ती कथा त्यांनी लिहिली असल्याचा त्यांचा आरोप आहे. चित्रपटात लेखक म्हणून क्रेडिट मिळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

  • 4 वर्षांपूर्वी नोंदणीकृत केले होते टायटल

भारती यांनी याचिकेत दावा केला आहे की, या कथेवर 'ब्लॅक डे' नावाचा चित्रपट बनवण्याची त्यांचा विचार होता. फेब्रुवारी 2015 मध्ये त्यांनी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर असोसिएशन (आयएमपीपीए) मध्ये याचे रजिस्ट्रेशन केले होते. त्यांच्यानुसार,  तेव्हापासून ते स्क्रिप्टवर काम करत आहे आणि नॅरेशनसाठी अनेक कलाकार आणि फॉक्स स्टार स्टुडिओसह अनेक निर्मात्यांना त्यांनी संपर्क साधला आहे. अपरिहार्य परिस्थितीमुळे हा प्रोजेक्ट सुरू होऊ शकला नाही, असे भारती म्हणाले. फॉक्स स्टार स्टुडिओवादेखील ही कल्पना सांगितली होती, ज्यावर 'छपाक' हा चित्रपट बनला. 

  • फॉक्स स्टार स्टुडिओकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने उच्च न्यायालयात गेले भारती

भारती यांचे वकील अशोक सरोगी यांच्या म्हणण्यानुसार, मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट फॉक्स स्टार स्टुडिओ तयार करत आहे हे जेव्हा याचिकाकर्त्यास समजले तेव्हा त्यांनी निर्मात्यांकडे तक्रार केली. पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना हायकोर्टाचा दरवाजा ठोठावा लागला. भारती यांनी आपल्या अपीलमध्ये चित्रपटातील लेखक म्हणून क्रेडिड देण्यासोबतच चित्रपटाची कथा आणि तिच्या पटकथाची तुलनात्मक चाचणी घेण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक करण्याची विनंती केली आहे. 27 डिसेंबर रोजी न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार आहे.  

  • 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार चित्रपट

'छपाक' हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या दिल्लीच्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. यात दीपिकाने मालती नावाची व्यक्तिरेखा साकारली असून अभिनेता विक्रांत मैसीचीही महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.