Home | Gossip | deepika padukone talk about pregnancy it will happen when happen

आई बनण्याच्या सततच्या प्रश्नांवर भडकली दीपिका पदुकोण, पुन्हा पुन्हा प्रेग्नन्सीबद्दल प्रश्न करणाऱ्यांना दिले सडेतोड 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 14, 2019, 11:03 AM IST

महिलांवर आई होण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रेशरबद्दल दीपिका बोलली बरेच काही... 

  • deepika padukone talk about pregnancy it will happen when happen

    एंटरटेनमेंट डेस्क : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या लग्नाला 6 महिने झाले आहेत. दोघांनी मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दोन रितीरिवाजांनी लग्न कर्लर होते. लग्नानंतर दीपिकाच्या प्रेग्नन्सीच्या अफवा उडत आहेत. आता जाऊन दीपिकाने या प्रश्नांवर प्रतिक्रया दिली आहे. तिने परत परत प्रेग्नन्सीबद्दल प्रश्न विचारणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. एका एंटरटेनमेंट पोर्टलला दिलेल्या इंटरव्यूमध्ये दीपिकाने सर्वकाही स्पष्टपणे सांगितले.

    - दीपिकाने इंटरव्यूदरम्यान सांगितले, 'हे जेव्हा व्हायचे असेल तेव्हा होईल. लग्नानंतर तर नेहमीच महिलांवर मुलांसाठी दबाव टाकला जातो. महिलांसोबत असे वर्तन केले नाही पाहिजे. ज्या दिवशी आपण असे प्रश्न विचारणे बंद करू, तेव्हाच आपण समाजात बदल पाहू शकू. मला माहित आहे की, मदरहुड लग्नतील महत्वाचे सुख आहे आणि कधी ना कधी तर होणारच आहे.'

    दीपिकाला मुले आवडतात...
    दीपिकाने काही वर्षांपूर्वी एका इंटरव्यूमध्ये सांगितले की, तिला मुले आवडतात. लग्नानंतर ती मुलांना जन्म देईन आणि फॅमिली लाइफ एन्जॉय करेल. पण ती तेव्हाही म्हणाली होती की, हे जेव्हा व्हायचे असेल तेव्हा होईल.

Trending