आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Padukone Talks About Her Depression Period, Reveals Why She Took Her This Battle In Public

दीपिका पदुकोण म्हणाली - नैराश्याच्या काळात मी रडण्यासाठी घराचा कोपरा शोधत होते, कदाचित तो चांगला काळ ठरु शकला असता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः  वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमुळे बरेच लोक नैराश्यात जातात. बॉलिवूडमधील कलाकारदेखील या नैराश्यातून सुटलेले नाहीत. त्यांनादेखील या गंभीर समस्येचा सामना करावा लागतो. दीपिका पदुकोणलादेखील नैराश्याचा सामना करावा लागला होता. नुकतीच तिने याविषयी माहिती दिली. तिने सांगितले, मी कधी आणि कशी डिप्रेशनमध्ये गेले मला काहीच कळले नाही. त्या काळात माझा जो वेळ गेला तो माझ्या जीवनातील सर्वात चांगला काळ ठरला असता.

  • डिप्रेशनविषयी दीपिकाने बरेच काही सांगितले...,

मी नैराश्यात कसे गेले याविषयी मला काहीच कळत नाही. त्या वेळी मी रडण्यासाठी कोपरा शोधायचे, एवढं मला आठवतेय. मात्र आताही ते दिवस आठवले की, अंगावर काटा येतो. एकदा मी सेटवर होते. गाण्याचे शूटिंग सुरू होते. सर्व कलाकार हसत खेळत होते. सर्व खुश होते. आनंदी वातावरण होते. मी मात्र एकटी आणि उदास होते. स्वत:मध्ये एकटी असल्याची जाणीव होत हाेती. मी  स्वत:ला बाथरूममध्ये बंद करून घेतले आणि रडू लागले. अभिनेत्री असल्यामुळे मी आपल्या करिअरमध्ये बिनधास्त मुलगी, सुंदर राणी ते दु:खी विधवेच्या भूमिका केल्या आहेत. मात्र ज्या भूमिकेने मला पूर्णपणे बदलले ते खऱ्या जीवनात नैराश्याची लढणाऱ्या मुलीच्या भूमिकेने. माझी त्या वेळची परिस्थिती समजून घेऊन मला उपचाराची गरज आहे का, याचा मी विचार करत हाेते. कारण ते माझ्यासाठी महत्त्वाचे हाेते. 2004 मध्ये मला याची लक्षणे जाणवू लागली. गाणेही त्या वेळी ऐकावेसे वाटत नव्हते मला त्या वेळी पूर्णवेळ थकवा जाणवायचा आणि मी उदास राहायचे. कुणी मला खुश करण्यासाठी गाणे वाजवायचे तर मला वाईट वाटायचे. जगणे अवघड झाले होते. पूर्ण वेळ झोपून राहावे वाटायचे. मी जेव्हा झोपायचे तेव्हा बरे वाटायचे. अनेक महिने मी गुपचूप सहन करत राहिले. मला काय झाले काहीच कळत नव्हते. या आजाराची मला नंतर माहिती कळली. त्या काळात माझे आई-वडील मला भेटायला मुंबईत आले. ते होते तोपर्यंत मी चांगले राहिले. तथापि, ज्या दिवशी ते परत जायला निघाले, त्या दिवशी विमानतळाकडे जाण्यापूर्वी मी खूप रडले. त्यावेळी आईने विचारले- काय झाले? मी म्हणाले- काही नाही. मग तिने विचारले काम काही अडचण आहे का? थोड्या वेळाने आई म्हणाली- दीपिका, तू एखाद्या तज्ञांची मदत घे.

  • नैराश्यात असल्याचे मी स्वीकारले...

मी मानसोपचार तज्ज्ञांकडे गेले, तेव्हा मी एकदम उदास हाेते, डाॅक्टरने मला क्लिनिकल डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले. मला डाॅक्टरने याविषयी पूर्ण माहिती दिली. त्यांनी लक्षणे सांगितली, त्या वेळी चांंगले वाटले की, आपल्यासोबत हे सर्व काही होत आहे याची माहिती डाॅक्टरला आहे. तो काळ खूपच वाईट होता. त्यानंतर माझी तपासणी सुरू झाली आणि उपचारही सुरू झाला. त्या वेळी नैराश्यात असल्याचे मी स्वीकारले. मी घाबरले नाही. डाॅक्टरने मला काही औषध लिहून दिली आणि आपल्या जीवन शैलीत बदल करायचे सुचवले.

बातम्या आणखी आहेत...