आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाला मिळाले डायमंडचे मंगळसूत्र, दीपिकाच्या मंगळसूत्रांची किंमत 20 लाख तर ऐश्वर्या घालते 45 लाखांचे मंगळसूत्र, किंमतीत अनुष्का शर्मा आहे आघाडीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः  बॉलिवूड अभिनेत्री फार क्वचितच गळ्यात मंगळसूत्र घालून दिसतात. पण याचा अर्थ त्यांच्यासाठी मंगळसूत्राचे महत्त्व नाही असा होत नाही. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींजवळ अतिशय महागडे मंगळसूत्र आहे. आता प्रियांका चोप्राचेच उदाहरण घ्या. अलीकडेच निक जोनाससोबत विवाहबद्ध झालेल्या प्रियांकाच्या गळ्यात निकने गोल्ड चेनमध्ये हार्ट शेपचे डायमंड पेंडंट असलेले मंगळसूत्र घातले.  प्रियांकाच्या या मंगळसूत्राची किंमत समोर आलेली नाही. पण आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या 8 अभिनेत्रींच्या महागड्या मंगळसूत्रांविषयी सांगत आहोत.... 

 

1. दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण अलीकडेच अभिनेता रणवीर सिंहसोबत इटलीतील लेक कोमो येथे विवाहबद्ध झाली. दीपिकाला लग्नात रणवीरने 20 लाखांचे मंगळसूत्र घातले. यामध्ये एक मोठे डायमंड लावले आहे. 

 

2. ऐश्वर्या राय
ऐश्वर्या राय बच्चन कधी भांगात कुंकू तर कधी गळ्यात मंगळसूत्र घालून दिसत असते. तिच्या मंगळसूत्राची किंमत तब्बल 45 लाख रुपये असून त्यात डायमंड लागले आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे 20 एप्रिल 2007 रोजी लग्न झाले होते.

बातम्या आणखी आहेत...