आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

''रणवीरचा प्रभाव पडला...'' - नणंदेच्या पार्टीत दीपिका झाली ट्रोल, कपड्यांवरुन सोशल मीडिया यूजर्स उडवत आहेत खिल्ली, एक जण म्हणाला, 'दीवानी' खरंच 'भवनानी' झाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः इटलीतील लेक कोमो येथे दोन पद्धतीने विवाहबद्ध झालेल्या रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाचे सेलिब्रेशन सुरु आहे. लग्नानंतर पहिले रिसेप्शन बंगळुरु येथे झाले. त्यानंतर दीपिकाची नणंद रितिका भवनानी हिने 24 नोव्हेंबर रोजी एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत दीपवीर सप्तरंगी आऊटफिटमध्ये दिसले. दीपिकाचा हा स्पेशल लूक डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केला होता. लूक आणि लहेंग्यावरुन आता मात्र दीपिका सोशल मीडियावर ट्रोल होत असून सोशल मीडिया यूजर्स तिची खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले, 'जणू रणवीरचा परिणाम दीपिकावर झालेला दिसतोय.'  एका कमेंटमध्ये तर 'लग्नानंतर दीपिका जणू वेडी झाली', असे लिहिले आहे.  

 

- दीपिकाच्या नणंदेने मुंबईतील ग्रॅण्ड ह्यात हॉटेलमध्ये डीजे पार्टी ठेवली होती. या पार्टीत फॅमिली आणि फ्रेंड्स सहभागी झाले होते. बॉलिवूडमधून फक्त श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ या पार्टीत सहभागी झाला होता.

 

दीपिकाच्या लहेंग्यावर होते फ्लोरल वर्क...
दीपिकाने या पार्टीत जो लहेंगा परिधान केला होता, तो सब्यसाचीच्या केसरी बाई पन्नालाल कलेक्शनमधील होता. या लहेंग्याचे नाव गुलदस्ता असे आहे. यावर अनेक प्रकारच्या फुलांचे वर्क होते.  

- दीपिकाच्या या सिल्क लहेंग्यावर सोने आणि चांदीचे वर्क होते. तर तिने घातलेली ज्वेलरीसुद्धा सब्यसाचीच्या हेरिटेज ज्वेलरी कलेक्शनमधील होती.

 

सोशल मीडियावर आलेल्या कमेंट्स..

- दीपिकाला बघून वाटतंय की, सब्यसाचीने हेलोविन कॉश्च्युम डिझाइन केला.
- या दोघांमध्ये जणू वाईट दिसण्याची कॉम्पिटिशन लागली आहे. 
- 'दीवानी'वर 'भवनानी'चा परिणाम दिसू लागला आहे.
- विचित्र ड्रेस, हेअरस्टाइल आणि मेकअप.. सब्यसाची हे काय केलंत तुम्ही..
- दीपिकावर खरंच रणवीरचा असर पडला आहे.
- वेडिंग आऊटफिटने खरंच निराशा केली. यापेक्षा तर लोकल डिझायनरने चांगला आऊटफिट बनवला असता.
- जणू एखाद्या लहानग्या मुलाने दीपिकाचे मेकअप केला असे दिसते.
- लग्नानंतर दीपिका वेडी तर झाली नाही ना...
- दीपिकाने पार्टीजमध्ये जाणे बंद करुन विश्रांती घ्यायला हवी.
- एखाद्या रोज गार्डनसारखी दीपिका दिसतेय. 


आणखी दोन रिसेप्शन होणार...
दीपवीरचे अजून दोन रिसेप्शन होणार आहेत. एक रिसेप्शन 28 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार आहे. यामध्ये रणवीरचे खास मित्र आणि फॅमिली फ्रेंड्स सहभागी होतील. त्यानंतर 1 डिसेंबर रोजी मुंबईतील हॉटेल ग्रॅण्ड ह्यात येथे दुसरे रिसेप्शन होणार असून यात बॉलिवूड सेलेब्स सहभागी होणार आहेत.  

बातम्या आणखी आहेत...