आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांच्या कमाईत 'तान्हाजी' ठरला हीरो, 'छपाक'ने केवळ 19 कोटी तर 'तान्हाजी'ने कमावले तब्बल 61 कोटी रुपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: अभिनेता अजय देवगण स्टारर 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. पहिल्या वीकेंडला (शुक्रवार, शनिवार, रविवार) या चित्रपटाने भारतात 61.75 कोटींचे कलेक्शन करत दीपिका पदुकोण स्टारर 'छपाक'ला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी (10 जानेवारी) रिलीज झालेल्या 'तान्हाजी'चे कलेक्शन शनिवार आणि रविवारी झपाट्याने वाढले. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारीच्या कलेक्शनमध्ये 36 टक्क्यांची वाढ झाली, तर रविवारी चित्रपटाने 72.7 टक्के अधिक कमाई केली.

  • असे राहिले 'तान्हाजी'चे कलेक्शन
दिवसकलेक्शन
शुक्रवार (10 जानेवारी)15.10 कोटी रुपये
शनिवार (11 जानेवारी)20.57 कोटी रुपये
रविवार (12 जानेवारी)26.08 कोटी रुपये
पहिला वीकेण्ड61.75कोटी रुपये

  • 'छपाक'च्या कलेक्शनमध्येही दिसली वाढ

दिवसकलेक्शन
शुक्रवार (10 जानेवारी)4.77 कोटी रुपये
शनिवार (11 जानेवारी)6.90 कोटी रुपये
रविवार (12 जानेवारी)7.35 कोटी रुपये
पहिला वीकेण्ड19.02 कोटी रुपये

'छपाक'बद्दल बोलायचे म्हणजे या चित्रपटाने भारतात पहिल्या वीकेण्डला 19.02 कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ 4.77 कोटींची कमाई केली होती. मात्र, दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ दिसून आली. शनिवारचे कलेक्शन शुक्रवारच्या तुलनेत 44.65 टक्के आणि रविवारी 54 टक्के अधिक होते. चित्रपटाच्या कलेक्शनवर एक नजर

  • व्यापार तज्ञ काय म्हणतात

व्यापार तज्ज्ञ तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून दोन्ही चित्रपटांच्या कलेक्शनचे आकडे शेअर केले आहेत. ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी' विषयी त्यांनी लिहिले आहे की, चित्रपटासाठी पहिला वीकेण्ड हिरोइक ठरला. त्यांच्या मते, जिथे महाराष्ट्रात कमालीची वाढ दिसली तिथे देशाच्या इतर सर्किटमध्येही दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी मोठी कमाई झाली. 

आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक'चा वीकेण्डचा ट्रेंड चांगला राहिला, पण त्याला फारसा खास म्हणता येणार नाही. चित्रपटाने प्रीमियम मल्टिप्लेक्समध्ये, विशेषत: शहरी क्षेत्रांमध्ये चांगली कमाई केली. तथापि,  सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी यादिवशी चांगली कमाई करणेदेखील आवश्यक आहे.

  • दोन्ही चित्रपटांनी निर्मिती खर्चाची निम्मी वसुली केली

'तान्हाजी' आणि 'छपाक' यांच्या कलेक्शनच्या आकड्यात मोठा फरक असला, तरी दोन्ही चित्रपटांनी जवळपास निर्मिती खर्चाचा निम्मा खर्च वसूल केला आहे हे नाकारता येणार नाही. 'तान्हाजी' हा अजय देवगणच्या होम प्रॉडक्शनचा चित्रपट असून त्याचे बजेट 120-150 कोटी आहे. त्याचबरोबर 'छपाक'द्वारे दीपिकाने निर्माती म्हणून इंडस्ट्रीत एक नवीन सुरुवात केली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 35-40 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...