आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर विचारले, कोणाला गिफ्ट पाहिजे, दीपिकाने मागितले हे गिफ्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये ख्रिसमसचा उत्साह शिगेला पोहोचला होता.  सोशल मीडियावर अनेक सेलेब्सनी रेड आउटफिट्समधील आपली छायाचित्रे पोस्ट करुन चाहत्यांना आनंददायी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेता कार्तिक आर्यनने इंस्टाग्रामवर एक छायाचित्र पोस्ट केले,  ज्यात त्याने रेड सांता कॅप घातलेली दिसतेय. कॅप्शनमध्ये त्याने  लिहिले, "सांता येथे असताना कशाची भीती बाळगावी, कोणाला भेटवस्तू हवी आहे."

दीपिकाने कार्तिककडे मागितले गिफ्ट
कार्तिकच्या या पोस्टवर कमेंट करताना दीपिका पदुकोणने लिहिले, "मला! जाऊन छपाक बघा.' यावर उत्तर देताना कार्तिकने लिहिले की, "ही आमच्यासाठी भेट आहे, चित्रपट बघण्यासाठी अजून प्रतीक्षा करू शकत नाही."

कार्तिकने दीपिकाला शिकवला होता डान्स 
दीपिका आणि कार्तिक अनेकदा इंस्टाग्रामवर चर्चा करतात दिसतात. 'पती पत्नी और वो'च्या  रिलीजवेळी, दीपिकाने कार्तिकला धीमे धीमे या गाण्यावर नृत्य शिकवण्याची विनंती केली होती. दीपिकाची ही विनंती मान्य करुन कार्तिकने तिला डान्स शिकवला होता.  या दोघांचा हा डान्स व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता.

बातम्या आणखी आहेत...