आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : शुक्रवारी रात्री दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर डायरेक्टर लव रंजनच्या घरी त्याची भेट घेण्यासाठी गेले होते. या भेटीनंतर असा अंदाज लावला जातो आहे की, ही जोडी डायरेक्टरच्या अपकमिंग चित्रपटात एकत्र काम करू शकते. पण दीपिकाचे लवच्या चित्रपटकाशी असे जोडले जाणे फॅन्सला आवडलेले नाहीये. दीपिकाला सोशल मीडियावर #NotMyDeepika ट्रेंड केले जात आहे. झाले असे की, लववर सेक्शुअल हरॅसमेंटचा आरोप लागला होता आणि फॅन्सची इच्छा नाही की, दीपिका अशा व्यक्तीच्या चित्रपटाशी जोडली जावी.
जसे दीपिका आणि रणबीरचे फोटोज व्हायरल झाले तसे फॅन्स दीपिकाला ट्रोल करू लागले. हे फोटोज लव रंजनच्या घराबाहेरची होते, ज्यामध्ये रणबीर आणि दीपिका, लवची भेट घेताना दिसले. फोटोज व्हायरल होताच ही बातमीदेखील वेगाने व्हायरल झाली की, दीपिका-रणबीर, लवच्या आगामी चित्रपटात एकत्र दिसू शकतात.
बातमी व्हायरल होताच ट्विटरवर दीपिकाला ट्रेंड केले जाऊ लागले. काह्हीनी तिला लवसोबत काम न करण्याचा सल्ला दिला तर काहींनी दीपिकाने लवसोबत काम करण्याच्या निर्णयाला प्रोफेशनल करार दिला. मागच्यावर्षी ऑक्टोबरमध्ये #metoo कॅम्पेनद्वारे सेक्शुअल हरॅसमेंटचा आरोप त्याच्यावर झाला होता. लवने 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टीटू की स्वीटी' यांसारखे चित्रपट बनवले आहेत. या चित्रपटांबद्दलही लोकांनी त्याच्यावर निशाणा साधला होता. लोकांचे म्हणणे असे आहे की, लव त्याच्या चित्रपटांमधून महिलांची प्रतिमा खराब करत असतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.