आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लग्नाच्या 6 महिन्यांनी आई होणार आहे दीपिका', जेव्हा रिपोर्टरने रणवीरला विचारला याचा अर्थ तर तो म्हणाला - मी जे म्हटले, त्याचा तोच अर्थ आहे, हे ऐकून हैराण झाली सारा अली खान : Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी 'सिम्बा' या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत दिग्दर्शकासोबत चित्रपटातील लीड अॅक्टर रणवीर सिंह, नवोदित सारा अली खान आणि निर्माता करण जोहर उपस्थित होते. यावेळी एका पत्रकाराने अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेल्या रणवीरला त्याची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या प्रेग्नेंसीशी निगडीत एक प्रश्न विचारला असता, रणवीरला हसू आवरले नाही. पण सारा, करण आणि रोहित हैराण झाले. 


पत्रकाराने रणवीरला आठवण करुन दिली जुन्या एका मुलाखतीची...  
- रिपोर्टरने रणवीरला हा प्रश्न त्याच्या एका जुन्या मुलाखतीची आठवण करुन देताना विचारला. काही वर्षांपूर्वी रणवीरने म्हटले होते की, लग्नाच्या सहा महिन्यांची दीपिका आई होईल. पत्रकाराने रणवीरला यावेळी याच वक्तव्याचा अर्थ विचारत आता यावर त्याचे काय म्हणणे आहे असे विचारले. पत्रकाराचा प्रश्न ऐकून रणवीरला हसू आले आणि मग रोहितला विचारले  - माझ्या मते 9 महिने लागतात ना? रोहितला असे विचारुन रणवीर पुढे म्हणाला, "मी जे म्हटले होते, त्याचा अर्थ तोच होतो." जेव्हा रिपोर्टरने रणवीरला याचे उत्तर सविस्तरपणे द्यायला सांगितले, तेव्हा रणवीर म्हणाला, "मी जेव्हा 2012 मध्ये दीपिकाला पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हाच पुढच्या सहा महिन्यांत हीच मुलगी माझ्यासाठी योग्य असल्याचे मला वाटले होते." म्हणजेच रणवीरच्या म्हणण्याचा अर्थ हा होता की, दीपिकाच त्याच्या मुलांची आई होऊ शकते.  

बातम्या आणखी आहेत...