आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढच्या वर्षी हॉलिवूड चित्रपटाची शूटिंग सुरु करणार दीपिका, संजय लीला भन्साळीच्या पुढच्या चित्रपटाची आली ऑफर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. दीपिका पादुकोणच्या यावर्षी रिलीज झालेल्या 'पद्मावत' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटानंतर 2018 मध्ये तिचा कोणताही चित्रपट रिलीज झाला नाही. आता तिने विशाल भारव्दाजचा सपना दीदी चित्रपट साइन केला असे वृत्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत इरफान खानला साइन करण्यात आले होते, पण त्यांची तब्येत बिघडल्यामुळे चित्रपट काही काळासाठी पुढे ढकलण्यात आला. यानंतर दीपिका तिच्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त झाली. याच काळात तिने मेघना गुलजारचा चित्रपट साइन केला, हा चित्रपट अॅसिड अटॅक सर्वाइव्हर लक्ष्मीचा बायोपिक आहे. 

 

हा चित्रपट दीपिका प्रोड्यूसरही करणार आहे. चित्रपटाची शूटिंग पुढच्यावर्षी मार्च महिन्यात सुरु होईल. यावर्षी रणवीर सिंहसोबत विवाहबंधनात अडकलेली दीपिका पादुकोण लवकरच कमबॅक करणार आहे. ती हॉलिवूड चित्रपट XXX च्या पुढच्या इंस्टॉलमेंटमध्ये दिसणार अशाही चर्चा आहेत. दीपिका या चित्रपटात असणार आहे हे मेकर्सने पहिलेच कन्फर्म केले आहे. 

 

भन्साळीच्या चित्रपटात दिसू शकते 
दीपिला संजय लीला भन्साळींचा पुढचा चित्रपट ऑफर करण्यात आला असल्याच्याही चर्चा आहेत. या चित्रपटात सलमान आणि शाहरुख खान एकत्र काम करणार आहेत. भन्साळी आणि दीपिकाने यापुर्वी राम-लीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावतमध्ये काम केले आहे. दीपिकाने शाहरुखसोबत ओम शांती ओम, हॅप्पी न्यू इयर आणि चेन्नई एक्सप्रेसमध्ये काम केले आहे. पण आपल्या अकरा वर्षांच्या कारकीर्दीत तिने सलमानसोबत अजूनही काम केलेल नाही. असे झाले तर दीपिका, सलमान आणि शाहरुख पहिल्यांदाच एकत्र दिसतील. 

 

सूत्रांनुसार दीपिका सध्या आपल्या डेट्सवर काम करत आहे. ती पुढच्या वर्षाच्या सुरुवातीच हॉलिवूड प्रोजेक्टवर काम सुरु करणार आहे. हा चित्रपटाचे काम पुर्वी या वर्षाच्या डिसेंबरलाच सुरु होणार होते, पण हे काम पुढे ढकलण्यात आले आहे. मेकर्सने चित्रपटाचे कास्टिंग आणि प्री-प्रोडक्शन वर्क पुर्ण केले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...