आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर पहिल्यांदाच बोल्ड लूकमध्ये दिसली मिसेस रणवीर सिंह, सोशल मीडियावर व्हायरल होतोय Photo

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या लग्नापासून ते तिन्ही रिसेप्शनमध्ये इंडियन आउटफिटमध्ये दिसली. कधी लहेंगा तर कधी साडीत तिचा सुंदर लूक तिच्या चाहत्यांना बघायला मिळाला. पण लग्नानंतर आता दीपिकाचे काही बोल्ड लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोजमध्ये रणवीर सिंहची पत्नी दीपिका रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसतेय. लग्नानंतरचा दीपिकाचा ड्रेस एवढा बोल्ड आहे की, त्यातून तिचे अंडरगार्मेंट्स स्पष्ट दिसत आहेत. दीपिकाचा हा लूक जीक्यू या फॅशन मॅगझिनमधील असून या मॅगझिनच्या नवीन अंकासाठी तिने हे फोटोशूट केले आहे. दीपिकाे लग्नापूर्वी या मॅगझिनला मुलाखत दिली होती आणि त्यामध्ये तिने रणवीरचे तोंडभरून कौतुक केले होते.


रणवीरचा दीपिकाहून अधिक आहे IQ...

- मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने सांगितले, "रणवीर व्हॅल्यूज समजतो, तो अतिशय भावूक आणि तेवढाच हुशार आहे. खास गोष्ट म्हणजे तो लहान मुलांप्रमाणे माझ्याशी वागतो. त्याच्या याच कॉलिटीज आहेत आणि तो खरा आहे"


- "भावूक होण्याविषयी तुम्ही मला विचारले तर मी त्याच्या पुढे आहे. पण माझ्यापेक्षा त्याचा IQ जास्त आहे. तो आणि मी दोघेही सेंसेटिव्ह आहोत. या सर्व गोष्टींमुळे आम्हाला एकमेकांना समजणे सोपे झाले आहे."


- दीपिका म्हणजे रणवीर माझा सर्वस्व आहे. तो माझा बेस्ट फ्रेंड, प्लेमेट आहे. त्याच्यासोबत मला स्वतंत्र असल्यासारखे वाटते.

 

भन्साळींच्या पुढच्या चित्रपटात असेल का दीपिका?
- संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटात दीपिका सलमान आणि शाहरुख खानसोबत काम करणार असल्याची चर्चा आहे. पण आता तिच्याऐवजी अनुष्का शर्मा या चित्रपटाचा भाग असल्याचे समोर येत आहे.


- सलमानने काही दिवसांपूर्वीच तो भन्साळींसोबत काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शाहरुखही असेच म्हणाला होता. आता सलमानची इच्छा आहे की, या चित्रपटात दीपिका नव्हे तर अनुष्काने काम करावे. कारण दीपिकाने यापूर्वी काही चित्रपटांत सलमानसोबत काम करण्यास नकार दिला होता.


- भन्साळींनी अद्याप चित्रपटातील  कलाकारांविषयीची फायनल अनाउंसमेंट केलेली नाही. जेव्हा ते याविषयीची अधिकृत घोषणा करतील तेव्हाच कलाकारांची नावे पुढे येतील.


- भन्साळी सध्या 'हीरा मंडी'या चित्रपटावर काम करत असून हा चित्रपट एका मुलीवर आधारित आहे. बातम्यांनुसार या चित्रपटात प्रियांका चोप्रा झळकण्याची शक्यता आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...