आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर पत्नी दीपिका पदुकोणने रणवीरवर घातले निर्बंध, ही तीन कामे करण्याची मुळीच नाही परवानगी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची गणना बॉलिवूडच्या हॉट कपलमध्ये केली जाते. लग्नानंतर या दोघांच्या आयुष्यात बराच बदल घडला आहे. रणवीरने अलीकडेच फिल्मफेअर या मॅगझिनला एक मुलाखत दिली असून लग्नानंतर त्याच्या आयुष्यात आलेल्या बदलांविषयी सांगितले आहे.  या मुलाखतीत रणवीरने खुलासा केला की, त्याला लग्नानंतर तीन गोष्टी करण्याची परवानगी नाही. पत्नी दीपिकाने त्याच्यावर काही निर्बंध घातले आहेत. 


- रणवीर लग्नाआधीपासूनच दीपिकासाठी क्रेझी होता. मुलाखतीत त्याने सांगितले की, दीपिकासोबत वेळ घालवण्यासाठी तो कुठेही असला तरी तिच्याजवळ पोहोचत होता.  


- लग्नानंतर आलेल्या बदलांविषयीही रणवीर यावेळी बोलला. लग्नानंतर अशा कुठल्या तीन गोष्टी तो करु शकत नाही, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला असता, त्याने सांगितले, मी घराबाहेर फार उशीरापर्यंत थांबू शकत नाही, जेवण केल्याशिवाय घराबाहेर पडू शकत नाही आणि दीपिकाचा एकही कॉल मिस करु शकत नाही. मुलाखतीत रणवीरने सांगितले की, त्याला हसबंड ऑफ द मिलेनियम हा किताब पटकावयाचा आहे.  

 

नव-यासोबत काम करण्यास दीपिकाने दिला नकार...
रिपोर्ट्सनुसार, '83' या आगामी चित्रपटाची  कहाणी क्रिकेटर कपिल देव आणि 1983 च्या वर्ल्ड कपवर आधारित आहे. या चित्रपटात आपल्यासाठी फारसे करण्यासारखे काही नाही, असे दीपिकाचे मक आहे. याशिवाय तिला चित्रपटात जो रोल ऑफर झाला होता, त्याची लांबीही अतिशय कमी होती. अर्थातच दीपिकाला निवडक सीन्समध्येच झळकण्याची संधी या चित्रपटात मिळाली असतील. त्यामुळे दीपिकाने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. याशिवाय चित्रपटात रणवीर सिंग आहे, म्हणून तिला काम करायचे नव्हते. 

 

- वर्कफ्रंटविषयी सांगायचे म्हणजे, दीपिका पदुकोण मेघना गुलजारच्या 'छपाक'मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट अॅसिड सर्व्हाइव्हर लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर बेतला आहे. तर रणवीर सिंग लवकरच 'गली बॉय' या चित्रपटात झळकणार असून यात त्याच्यासोबत आलिया भट मेन लीडमध्ये आहे. दीपिका आणि रणवीर यांचे गेल्यावर्षी  14 आणि 15 नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो येथे सिंधी आणि कोंकणी पद्धतीने लग्न झाले. लग्नापूर्वी हे दोघे सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.  

बातम्या आणखी आहेत...