आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलिशान आहे दीपिका पदुकोणचा आशियाना, बघा घराचे इनसाइड फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा आज (5 जानेवारी) वाढदिवस असून तिने वयाची 34 वर्षे पूर्ण केली आहेत. 5 जानेवारी, 1986 रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन शहरात जन्मलेल्या दीपिकाने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. दीपिका बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्रींपैकी एक आहे.   


दीपिका पदुकोणचे घर मुंबईतील प्रभादेवी येथील ब्यूमोंड टॉवरमध्ये आहे. 33 मजल्यांच्या या इमारतीत 26 व्या मजल्यावर दीपिकाचे घर आहे. दीपिकाने 2016 मध्ये 16 कोटींना हे घर विकत घेतले होते. आता दीपिकाचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगने याच बिल्डिंगमध्ये चार बीएचकेचे घर भाड्याने घेतले आहे. रणवीरने हे घर तीन वर्षांसाठी घेतले आहे. विशेष म्हणजे या घराचे महिन्याचे भाडे 7.97  लाख रुपये इतके आहे. रणवीरने हे घर स्वतःसाठी घेतले आहे की कोणत्या कामासाठी हे कळू शकलेले नाही.

  • आलिशान आहे दीपिकाचा आशियाना

दीपिकचे हे 4 BHK अपार्टमेंट 2776 Sq.Ft मध्ये आहे.  आर्किटेक्चरल डाइजेस्ट मॅगझिनच्या पहिल्या अंकासाठी दीपिकाने तिच्या घरात एक स्पेशल फोटोशूट केले होते. यामध्ये दीपिकाच्या लॅव्हिश अपार्टमेंटची झलक बघायला मिळते.  विनीता चैतन्य यांनी दीपिकाच्या या घराचे इंटेरिअर डिझाइन केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...