आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन बेंगलुरुमध्ये 21 नोव्हेंबरला होत आहे. रिसेप्शनसाठी रणवीर पहिले मंगळवारी आपल्या सासरी बेंगळुरुमध्ये पोहोचला. तर रात्री उशीरा त्याची आई अंजू भवनानी आणि वडील जगजीत सिंह भवनानीही व्याहीच्या घरी पोहोचले. दीपिकाचे सासु-सास-यांचे पादुकोण कुटूंबाने जोरदार स्वागत केले. समोर आलेल्या फोटोजमध्ये दोघंही खुप एक्सायटेड दिसत आहेत. 'द लीला पॅलेस'मध्ये होणारे हे रिसेप्शन दीपिकाचे पालक प्रकाश पदुकोण आणि उज्वला पादुकोण होस्ट करत आहेत. पार्टीमध्ये स्पोर्ट्स जगतातील दिग्गज आणि दीपिकाच्या माहेरचे नातेवाईक उपस्थित असतील. पहिल्या रिसेप्शनमध्ये दीपवीर सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेल्या ड्रेसेसमध्ये दिसणार आहेत.
दीपिकाच्या घरी झाली सजावाट
- दीपिकाच्या आई-वडिलांच्या घरी डेकोरेशन करण्यात आले आहे. घर नववधुप्रमाणे सजवण्यात आले आहे.
- बिल्डिंगपासून बाहेरच्या बाउंड्रीपर्यंत लाइटिंगने सजावट करण्यात आली आहे. तर घराबाहेरच्या झाडांवर लायटिंगचे झुंबर लावण्यात आले आहेत.
- मंगळवारी रात्री रणवीर सासरी पोहोचला तेव्हा सासु उज्वला पादुकोण आणि सासरे प्रकाश पादुकोण यांनी त्याचे स्वागत केले.
- यावेळी रणवीरने सासरच्या बालकनीमध्ये येऊन मीडियासोबत बातचित केली. फोटोमध्ये बालकनीमध्ये सजावाट दिसत आहे.
दीपवीरच्या लग्नाचे 3 रिसेप्शन
- 21 नोव्हेंबरला बेंगलुरुच्या 'द लीला पॅलेस' हॉटेलमध्ये दीपवीरच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन आहे. यामध्ये दोन्ही कुटूंबातील जवळचे नातेवाईक आणि फ्रेंड्सला आमंत्रित करण्यात आले आहे.
- यानंतर 28 नोव्हेंबरला मुंबईमध्ये अजून एक रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. हे रिसेप्शन रणवीरचे पालक होस्ट करतील. यामध्ये मीडिया पर्सन आणि भवनानी कुटूंबातील जवळचे लोक सहभागी होतील.
- तर 1 डिसेंबरला मुंबईमध्ये अजून एक रिसेप्शन असणार आहे. यामध्ये बॉलिवूड सेलेब्स आणि दूस-या फिल्डचे लोकही हजेरी लावतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.