रिसेप्शनमध्ये प्रियांका-दीपिकामध्ये दिसली / रिसेप्शनमध्ये प्रियांका-दीपिकामध्ये दिसली डान्स कॉम्पिटीशन, 'गल्ला गुडियां' गाण्यावर थिरकला निक जोनास : Video

रॅप साँगवर सगळ्यांना हसवताना दिसला रणवीर सिंह

Dec 23,2018 12:28:00 AM IST

मुंबईः प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी बॉलिवूड फ्रेंड्ससाठी गुरुवारी एका रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत दीपिका आणि रणवीर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलेब्स नवविवाहित दाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. पार्टीत प्रियांका-निक आणि दीपिका-रणवीर यांच्यात डान्स कॉम्पिटीशन बघायला मिळाली. प्रियांकाने 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील 'पिंगा'वर निकसोबत ताल धरला तर दीपिकासुद्धा रणवीरसोबत याच गाण्यावर थिरकली. नंतर दोन्ही कपलनी 'दिल धडकने दो' या चित्रपटातील 'गल्ला गूडियां'वरही डान्स केला. यासोबतच रणवीर सिंह रॅप साँग गाऊन लोकांना हसवताना दिसला.


प्रियांका-निकच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले हे सेलेब्स...
निकयांकाच्या रिसेप्शनमध्ये सलमान खानसह दीपिका-रणवीर, कतरिना कैफ, स्वरा भास्कर, परिणीती चोप्रा, राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा, करण जोहर, कियारा आडवाणी, यामी गौतम, डाएना पेंटी, नवाज़ुद्दीन सिद्दीकी, दीया मिर्झा, सोफी चौधरी, कार्तिक आर्यन, हरमन बावेजा, जॅकी भगनानी, डिनो मोरया, तनिषा मुखर्जी, गोविंदा, अनिल कपूर, अनुपम खेर, सतीश कौशिक, बॉबी देओल, पूजा हेगडे, राज बब्बर, अमीषा पटेल, साऊथ अॅक्ट्रेस तमन्ना भाटिया, पत्नी प्रियांकासोबत विवेक ओबरॉय, रवीना टंडन, जायरा वसीम, रणधीर कपूर, कंगना रनोट रेखा, विद्या बालन, संजय दत्तसह अनेक बॉलिवूड स्टार्स पोहोचले होते.

X