आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Ranveer Full Family Photos With In Laws: Ranveer Singh Dance On Stage To Promote Film Simba In Reception And Become DJ Also

एकाच फ्रेममध्ये दिसली दीपवीरची पूर्ण फॅमिली, पत्नीच्या कुटुंबीयांची काळजी घेत होता रणवीर तर काहीशी काळजीत दिसली दीपिकाची सासरची मंडळी : Inside Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः रणवीर-दीपिकाच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन बुधवारी 28 नोव्हेंबर रोजी मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये झाले. रिसेप्शनचे अनेक इनसाइड व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर समोर आले आहेत. यापैकी एका फोटोत दीपवीरची संपूर्ण फॅमिली एकाच फ्रेममध्ये दिसली. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण, आई उज्जवला पदुकोण, बहीण अनीशा पदुकोण आणि रणवीरची आई अंजू भवनानी, वडील जगजीत भवनानी आणि बहीण रितिका भवनानी एकत्र  फ्रेम शेअर करताना दिसले. एका फोटोत रणवीर पत्नीच्या कुटुंबीयांची काळजी घेताना दिसला. तर दुसरीकडे दीपिकाची सासरची मंडळी मात्र थोडी काळजीत दिसली. रिसेप्शनमध्ये दीपिकाने गोल्डन एम्ब्रोयडरी असलेला चिकनकारी साडी आणि हेवी ओढणी कॅरी केली होती. तर रणवीरसुद्धा मॅचिंग शेरवानीत दिसला. कपलचे ड्रेसेस अबू जानी -संदीप खोसला आणि रोहित बल यांनी डिझाइन केले होते.

 

येत्या 1 डिसेंबर रोजी रणवीर आणि दीपिका यांचे तिसरे वेडिंग रिसेप्शन मुंबईतच ग्रॅण्ड ह्यात हॉटेलमध्ये होणार आहे. असे म्हटले जात आहे की, तिस-या रिसेप्शनच्या दुस-याच दिवशी रणवीर शूटिंगवर परतणार असून त्याच्या आगामी  'सिम्बा' या चित्रपटातील टायटल साँग शूट करणार आहे. सारा अली खानसोबत गोवा आणि मुंबईत हे शूटिंग होणार आहे. 28 डिसेंबर रोजी सिम्बाच्या रिलीजनंतर हे कपल हनीमूनवर जाणार आहे. 


रिसेप्शनमध्येच 'सिम्बा'चे प्रमोशन करु लागला रणवीर... 
- दीपिका आणि रणवीरच्या रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत अतिशय शानदार पद्धतीने झाले. समोर आलेल्या इनसाइड व्हिडिओजमध्ये दीपिका गेस्टसोबत बोलताना तर रणवीर फोटोग्राफर्ससमोर डान्स करताना दिसतोय.


- स्टेजवर पोहोचल्यानंतर रणवीरने त्याच्या आगामी 'सिम्बा' या चित्रपटाला प्रमोट करायला सुरुवात केली. तो स्टेजवर सिम्बा स्टाइलमध्ये डान्स करत असताना दीपिकाला हसू आवरले नाही.


- इतकेच नाही तर रिसेप्शनमध्ये रणवीर डीजेही बनला. रणवीरने डीजेवर त्याच्या आवडीची गाणी प्ले केली आणि मनसोक्त ताल धरला.


- मीडिया आणि फॅमिलीसाठी दीपवीरने डेझर्ट काऊंटरवर आइसक्रीम रोल्स, स्नो फ्लेक्स, रसमलाई, गाजरचा हलवा, चॉकलेट्स आणि पेस्ट्रीज या मिठाई सर्व्ह केल्या.


1 डिसेंबर रोजी बॉलिवूड सेलेब्ससाठी होणार ग्रॅण्ड रिसेप्शन...
- दीपिका-रणवीरचे तिसरे रिसेप्शन 1 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे. यामध्ये बॉलिवूड आणि इतर क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील.


- दीपवीरने 14-15 नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो येथे सप्तपदी घेतल्या. 14 नोव्हेंबर रोजी कोंकणी पद्धतीने आणि 15 नोव्हेंबर रोजी सिंधी पद्धतीने हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.


- दीपिका-रणवीरचे अफेअर 5 वर्षांपूर्वी 'गोलियों की रासलीला : रामलीला' (2013) च्या सेटवर सुरु झाले होते. त्यानंतर हे दोघे  'फाइंडिंग फॅनी', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटांमध्ये एकत्र झळकले. 

बातम्या आणखी आहेत...