आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika ranveer Singh Education Qualification:Ranveer Singh Shoes Collection Cost Is 68 Lack And Deepika Have Own 40 Crore Flat

फक्त 12 वी पास आहे रणवीरची बायको, जाणून घ्या दोघांमधून कोण आहे जास्त शिकलेले?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहने 14 नोव्हेंबरला कोंकणी पध्दतीने इटलीमध्ये लग्न केले. या लग्न सोहळ्यात निवडक पाहूणे सहभागी झाले होते. दीपिका आणि रणवीर बॉलिवूडचे सर्वात प्रसिध्द कपल्समधून एक आहेत. दोघं परफेक्ट कपल असल्याचे चाहते म्हणतात. पण दीपिका आणि रणवीरमधून कोण जास्त शिकलेले आहे तुम्हाला माहिती आहे का? रणवीरने अमेरिकाच्या इंडियाना यूनिव्हर्सिटीमधून आर्ट्समधून ग्रॅज्यूएशन केले आहे. तर दीपिकाने फक्त 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. शाळेनंतर दीपिकाने कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले, पण मॉडलिंगमुळे तिने शिक्षण मध्येच सोडले. दीपिकाने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने ग्रॅज्यूएशन फर्स्ट ईयरमध्ये अॅडमिशन घेतले होते, पण नंतर ती पुढे शिक्षण घेऊ शकली नाही. तिने सांगितले होते की, नंतर शिक्षण न घेतल्यामुळे तिच्या घरचे नाराज राहायचे.

 

दीपिकाने 24 तर रणऴीरने केले आहेत 13 चित्रपट 
- बॉलिवूडची हायएस्ट पेड अॅक्ट्रेसेसमधून एक असलेल्या दीपिकाने आपल्या 11 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये 24 चित्रपट केले आहेत.
- तिने 2007 मधून 'ओम शांती शोम' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
- आतापर्यंत तिने  'बचना-ए-हसीनों', 'हाउसफुल', 'कॉकटेल', 'रेस 2', 'चेन्नई एक्सप्रेस', 'हैप्पी न्यू ईयर', 'पीकू', 'तमाशा', 'बाजीराव मस्तानी' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
- तर रणवीरने आपल्या 8 वर्षांच्या करिअरमध्ये फक्त 13 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने 2010 मध्ये आलेल्या 'बँड बाजा बरात'मधून डेब्यू केला होता.
- यानंतर त्याने 'लेडीज वर्सेस रिकी बहल', 'रामलीला', 'गुंडे', 'दिल धड़कने दो', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत'  सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
- रणवीरचा आगामी चित्रपट 'सिंबा' आणि 'गली बॉय' आहे. तर दीपिकाजवळ सध्या कोणताही चित्रपट नाही. ती 'झीरो' चित्रपटात गेस्ट अपीयरेन्स देताना दिसेल.

 

2 फ्लॅटची मालकिन आणि महागड्या कारची शौकीन आहे दीपिका 
- 102 कोटींची संपत्ती असणा-या दीपिकाचा बांद्रा(मुंबई)मध्ये एक फ्लॅट आहे. याची किंमत जवळपास 7 कोटी रुपये आहे. यासोबतच प्रभादेवी परिसरात तिचा एक फ्लॅट आहे. याची किंमत जवळपास 40 कोटी आहे.
- दीपिकाला हँड बॅग्सचा शोक आहे, तिच्या कलेक्शनमध्ये अनेक महागड्या ब्रांड्स बॅगचा समावेश आहे. तिच्याजवळ Fendi Dotcom Studded Satchel(किंमत 2.52 लाख रु.), Chanel Boy Flap बॅग( किंमत जवळपास 3.48 लाख रु.), गुची साइलिव (2.26 लाख रुपये), सीलाइन फँटम (1.45 लाख रुपये), Gucci Dionysus (2.26 लाख रुपये), सेंट लॉरेंन (2.32 लाख रुपये), हर्मंस बर्किन (8 लाख रुपये) यांसारखे ब्रांड्स आहेत.
- दीपिकाजवळ टिसॉट क्लासिक प्रिंस डायमंड वॉच आहे. यामध्ये 18 कॅरेट रोड गोल्ड डायमंड आहेत. याची किंमत 8 लाख रुपये आहे.
- कार कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर दीपिकाजवळ मर्सिडीज Maybach S500 (1.67 कोटी रुपये), ऑडी ए 8 (1.56 कोटी रुपये), ऑडी क्यू 7 (93.35 लाख रुपये), बीएमडब्ल्यू 5 सीरिज (64 लाख रुपये), मिनी कूपर Cabriolet(36.1 लाख रुपये) या कार आहेत.

 

रणवीरला आहे कारचा शौक 
- 136 कोटी रुपयांची संपत्ती असणा-या रणवीर सिंहचा गोव्यामध्ये एक बंगला आहे. याची किंमत 9 कोटी रुपये आहे. यासोबतच गोरेगाव, मुंबईमध्ये त्याचा एक फ्लॅट आहे. याची किंमत 10 कोटी रुपये आहे. प्रभादेवी, मुंबईमध्ये सी-फेसिंग अजून एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट त्याने 15 कोटींमध्ये खरेदी केला होता.
- रणवीरजवळ अनेक चांगल्या मॉडल्सच्या कार आहेत. त्याच्याजवळ Aston Martin Rapide (3.29 कोटी रुपये), लँड रोवर रेंज रोवर वोग (2.05 कोटी रुपये), जगुआर एक्सजेएल (1.07 कोटी रुपये), टोयेटा लँड क्रूज परडो (1.04 कोटी रुपये), मर्सिडीज बेंच जीलेएस (83 लाख रुपये), मर्सिडीज बेंच ई क्लास (70 लाख रुपये), ऑडी क्यू 5 (59.78 लाख रुपये), Maruti Ciaz (10.97 लाख रुपये) यांसारख्या कार आहेत.
- रणवीरजवळ कारचे चांगले कलेक्शन आहे, यासोबतच त्याच्याकडे बुटांचे विशेष कलेक्शन आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये जवळपास 1 हजार बुट आहेत. याची किंमत 68 लाख आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...