आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटली / दीपिका-रणवीर कोकणी पद्धतीने झाले विवाहबद्ध, आज घेणार सप्तपदी, PHOTOS आलेत समोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण बुधवारी इटलीतील लेक कोमो येथे विवाहबद्ध झाले. कोकणी-सारस्वत पद्धतीने त्यांचे लग्न लागले. लग्नात दीपिकाने व्हाइट आणि गोल्डन कलरची साडी परिधान केली होती. तर रणवीरही व्हाइट आउटफिटमध्ये दिसला. दोघांचे लग्नाचे कपडे फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केले आहेत. गुरुवारी दीपिका आणि रणवीर सिंधी पद्धतीने लग्न थाटणार आहेत. दीपिका कोकणी तर रणवीर सिंधी कुटुंबातून आहे. 

 

यापूर्वी मंगळवारी लेक कोमो येथे संगीत, हळदी आणि मेंदी सेरेमनी पार पडली. यावेळी रणवीरने गुडघ्यावर बसून दीपिकाला प्रपोज केले. रणवीरने  'तूने मारी एंट्रियां' हे गाणे गायले आणि एक स्पीचही दिली. रणवीरची स्पीच ऐकून दीपिका भावूक झाली होती. 


संगीत सेरेमनीत दीपिका व्हाइट तर रणवीर दिसला ब्लॅक आउटफिटमध्ये...  
- संगीत सेरेमनीसाठी दीपिकाने व्हाइट तर रणवीरने ब्लॅक आउटफिटला पसंती दिली होती.
- यावेळी क्लासिकल सिंगर शुभा मुद्रलने ठुमरी सादर केली. संगीत सेरेमनीत उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी ठेका धरला होता. 
- रणवीरने ढोल वाजवला आणि आपल्या लेडी लव्हसाठी गाणे गायले.
- पाहुण्यांनी 'मेहंदी नी मेहंदी..', 'काला शा काला..', 'मेहंदी है रचने वाली..' या गाण्यांवर डान्स केला. 

 

वेडिंग सेरेमनीचा उतरवण्यात आला आहे वीमा : 

दीपिका आणि रणवीर यांनी वेडिंग सेरेमनीचा वीमा उतरवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांनी ओरिएंटल इंश्योरन्स कंपनीकडून आपल्या लग्नाचा वीमा काढला आहे. याची पॉलिसी रणवीरच्या नावी आहे. जर लग्नाच्या पाच दिवसांत काही नुकसान झाले, तर वीमा कंपनीकडून त्यांना नुकसानभरपाई मिळेल. 

 

हाईटेक इन्व्हिटेशन कार्ड, पाहुण्यांच्या मोबाइल-कॅमे-यावर चिकटवले स्टिकर  

- रणवीर आणि दीपिकाचे रिसेप्शन कार्ड हाईटेक आहे. रिसेप्शन ठिकाणी ‘ई-इन्वाइट' घेऊन येणे सक्तीचे असल्याचे या कार्डवर नमुद करण्यात आले आहे. रिसेप्शनस्थळी प्रवेश घेताना पाहुण्यांच्या मोबाइलमध्ये असलेल्या ई-इन्व्हाइटवरील QR कोड स्कॅन केला जाणार आहे.
- दीप-वीरच्या लग्नाचे फोटोज पाहुणे क्लिक करु शकणार नाहीत.  पाहुण्यांच्या मोबाइल आणि कॅमे-यावर स्टिकर चिकटवण्यात आले आहेत.
- लग्नाचे पहिले रिसेप्शन 21 नोव्हेंबर रोजी बंगळूरु आणि दुसरे रिसेप्शन 28 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार आहे.

 

सेलिब्रिटी वेडिंग प्लानर वंदना मोहनने केले प्लानिंग... 

दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे प्लानिंग सेलिब्रिटी वेडिंग प्लानर वंदना मोहनने केले आहे. इटलीतील क्लासिक आर्किटेक्चर आणि तेथील अद्भूत सौंदर्यामुळे रणवीर-दीपिका यांनी लेक कोमोची निवड लग्नासाठी केली आहे. वंदनाने यापूर्वी इटलीतील फ्लोरेंसमधील उद्योगपति पार्थ जिंदल-अनुश्री जसानी आणि विएनामध्ये तन्वी जिंदलचे वेडिंग प्लान केले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...