आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर-दीपिका सोशल मीडियावर स्वतः शेअर करणार लग्नाचे फोटोज, हे आहे यामागचे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणचे लग्न झाले आहे. पण इटलीमध्ये सुरु असलेल्या वेडिंग फंक्शनचा एकही व्हिडिओ सोशल मीडियावर आलेला नाही. यामागे एक मोठे कारण असल्याचे समोर आले आहे. पिंकविला रिपोर्टनुसार दीपिका आणि रणवीरला त्यांचा कोणताही ऑफ गार्ड फोटो व्हायरल होऊ नये असे वाटते. यामुळे त्यांनी पाहूण्यांनाही फोटो किंवा व्हिडिओ न काढण्याची रिक्वेस्ट केली आहे.


मोमेंट कॅप्चर करत आहेत प्रोफेशनल 
आयुष्यातील सर्वात महत्वाच्या प्रसंगांचे फोटोज हे सिलेक्टेड असावे असे या नवदाम्पत्याला वाटते. यामुळे ते स्वतःच हे फोटोज आणि व्हिडिओज आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करतील. विशेष म्हणजे इटलीला गेलेले सर्व पाहुणे, रणवीर आणि दीपिकाचे स्टायलिस्ट्स आणि इतर प्रोफेशनल्सच्या मोबाइल कॅमेरावर स्टीकर लावण्यात आले आहेत. यामुळे कोणीही या कपलचे फोटो क्लिक करुन शकणार नाही.

 

उद्या होणार सिंधी पध्दतीने लग्न 
रणवीर आणि दीपिकाचे लग्न साउथ इंडियन पध्दतीने झाले आहे. आता 15 नोव्हेंबरला दोघं सिंधी पध्दतीने लग्न करणार आहेत. रणवीर सिंधी कम्युनिटीमधून आहे, यामुळे दोघांनी दोन पध्दतीने लग्न करण्याचे ठरवले होते.

 

साडे चार तासांचा फरक 
भारत आणि इटलीच्या वेळेत जवळपास 4 तास 30 मिनिटांचा फरक आहे. जेव्हा इटलीमध्ये दुपारचे 12 वाजतात तेव्हा भारतात संध्याकाळचे 4.30 होतात. दीपिका-रणवीरचे लग्न इटलीच्या वेळेनुसार सकाळी 7 वाजता झाले. तर त्यावेळी भारतात सकाळचे 11.30 वाजले होते.
 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...