• Home
  • News
  • Deepika saw a glimpse of Kapil's daughter, wrote on social media 'She is very sweet'

इंस्टाग्राम / दीपिकाने पाहिली कपिलच्या मुलीची झलक, सोशल मीडियावर लिहिले - 'खूप गोड आहे'

'छपाक' च्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये पोहोचली होती दीपिका 

दिव्य मराठी वेब टीम

Dec 13,2019 12:46:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : कपिल शर्माला 10 डिसेंबरला कन्यारत्न प्राप्त झाले. त्याची पत्नी गिन्नी चतरथने पहिल्याच अॅनिव्हर्सरीच्या दोन दिवस अगोदर मुंबईमध्ये मुलीला जन्म दिला. कपिलने सोशल मीडियावर ही बातमी शेअर करून लिहिले - आमच्या घरी मुलगी आली आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे. जय माता दी. कपिलच्या या पोस्टनंतर शुभेच्छांनीचे सोशल मीडिया अकाउंट भरले आहे. फॅन्सपासून ते अनेक सेलिब्रिटींनी त्याला पिता बनल्याच्या शुभेच्छा दिल्या. कपिल मुलीच्या जन्मामुळे खूप खुश आहे. पण व्यस्त शेड्यूलमुळे त्याला कपिल शर्मा शोच्या शूटिंगमधून ब्रेक घेऊ शकत नाहीये. त्याने दीपिका पदुकोण आणि मेघना गुलजारसोबत एका एपिसोडचे शूटिंग केले आहे.


कपिलने दीपिकाला दाखवली मुलीची झलक...


शूटिंगचे काही फोटोज सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले - 'कपिलने दीपिकाला आपल्या मुलीची झलक दाखवली असेल का ?' या प्रश्नाचे उत्तर स्वतः दीपिका पदुकोणने दिले आहे. तिने विरलच्या पोस्टवर कमेंट करून लिहिले, 'हो, कपिलने मुलीचे फोटो दाखवले आहेत आणि ती खूपच गोड आहे.'


विरल भयानीची पोस्ट...


'छपाक' च्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये पोहोचली होती दीपिका...


कपिलच्या शोमध्ये दीपिका आपला आगामी चित्रपट 'छपाक' च्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. चित्रपट 10 जानेवारी 2020 ला रिलीज होईल. या चित्रपटात दीपिका अॅसिड अटॅक सर्वायव्हर मालतीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. चित्रपट अॅसिड अटॅक सर्वायव्हर लक्ष्मी अग्रवालच्या खऱ्या आयुष्यातील कथेवर आधारित आहे.

X
COMMENT