आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेनमेंट डेस्क : दीपिका पादुकोणचा 'छपाक' चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये रिलीज होणार आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडितेवर आधारित या चित्रपटात दीपिका अॅसिड हल्ल्याची पीडित लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची दिग्दर्शक मेघना गुलजारने नुकतीच या चित्रपटाविषयी माहिती दिली. तिने सांगितले, जेव्हा मी दीपिकाकडे या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन गेले तेव्हा तिला लाइट मूडचा चित्रपट करायचा होता. मात्र जेव्हा तिने याची स्क्रिप्ट वाचली तेव्हा ती नकार देऊ शकली नाही.
मेघनाने पुढे सांगितले...,  या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिताना अनेकदा काहीतरी अशक्य गोष्ट करत असल्याचे वाटले. यासाठी एकही हिरोइन तयार होणार नाही असे वाटले. स्क्रिप्ट पूर्ण केल्यानंतर 'राजी' चित्रपट बनवला. त्यानंतर जनरल मानेक शॉच्या स्क्रिप्टवर विचार करू लागले. एकवेळ वाटले मानेक शॉच्या तयारीमध्ये वेळ लागेल त्यामुळे आधी 'छपाक'वर काम सुरू करायला हवे. अचानक एक दिवस वाटले यासाठी दीपिकाशाी संपर्क साधायला हवा. मीही तेच केले. सुमारे अर्धा तास मीटिंगच्या शेवटी तिने मला सांगितले, पाठाेपाठ दोन ते तीन गंभीर चित्रपट केल्यानंतर मला अाता हलकाफुलका चित्रपट करायचा आहे, परंतु मी हा चित्रपटही नाकारू शकत नाही. जसे अचानक मला तिला भेटण्याचा विचार मनात आला होता तसाच हा चित्रपट करण्याचा विचार तिच्या मनात आला. माझा अनुभव असा की, जेव्हा एखाद्या सिनेमाबरोबर असे घडते तेव्हा ते शुभ होते. '
याच्या शीर्षकावरून बरेच काही कळते...
या चित्रपटाचे टायटल 'छपाक' का ठेवले याविषयी तिला विचारले असता मेघना म्हणाली..., पाणी किंवा कोणताही तरल पदार्थ सांडतो तेव्हा त्याचा ध्वनी असाच येतो किंवा लोक यासाठी याच शब्दाचा वापर करतात. जेव्हा मी या शीर्षकावर विचार करत होते तेव्हा डोक्यात अनेक शीर्षके येत होती, मात्र मला कठोरही शब्द नको होता आणि नाजूकही नको होता. या दोन्हीमधील एक असा शब्द, जो रूपक म्हणून मला हवा होता. त्यामुळे मी हे 'छपाक' टायटल ठेवले. हा एक तरळ पदार्थच आहे, मात्र तो किती भयंकर आहे.
चित्रपटात दिल्ली दिसेल आणि ऐकूही येईल
मूळत: दक्षिण भारतीय दीपिका या सिनेमात दिल्लीच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या भूमिकेचा तपशील सांगत मेघना म्हणाल्या, 'दिल्लीत कसे बाेलतात? चित्रपटात दाखवल्याप्रमाणे दिल्लीतील लोक खरोखरच तसं बोलत नाहीत. पारशी लोकांना ज्या प्रकारे बोलताना दाखवले जाते, वास्तविक जीवनात ते तसे नसतात. हे सर्व फक्त चित्रपटांमध्ये दाखवले जाते. दिल्लीची बोलीभाषा थोडी वेगळी आहे. आम्ही तसेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीत झाले आहे. त्यामुळे तुम्हाला दिल्ली ऐकूही येईल आणि दिसेलही. मुंबईच्या फिल्म सिटी येथे शूटिंग करून मी दिल्ली सांगणार नाही.
ह्यूमन राइट्स डेवर 'छपाक'चे ट्रेलर येईल
या चित्रपटाचे ट्रेलर १० डिसेंबर रोजी जागतिक मानव अधिकार दिवशी रिलीज होणार आहे. चित्रपटाची कथादेखील अॅसिड हल्ल्यातील पीडितेवर आधारित आहे. ट्रेलर लाँच करण्यासाठी यापेक्षा चांगला दुसरा दिवस होऊ शकत नाही. दीपिका या भूमिकेसाठी याेग्य होती. लक्ष्मी आणि तिच्यात एक साम्य आहे. मी लक्ष्मीचे अॅटकपूर्वीचे फोटो पहिले आहेत. दोघींचे हसणेदेखील सारखेच आहे. दीपिकाशिवाय मी हा चित्रपट करू शकले नसते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.