आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Wept At The Trailer Launch, Said Had Decided To Do The Film In A Few Minutes After Meeting The Director

ट्रेलर लाँचला दीपिका अश्रू अनावर, म्हणाली - अवघ्या काही मिनिटांत चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

  बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकताच तिच्या आगामी छपाक या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे. मुंबईत हा सोहळा पार पडला. यावेळी  दीपिका चित्रपटाविषयी बोलताना अतिशय भावूक झाली आणि तिला तिला अश्रू अनावर झाले. अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अगरवालच्या आयुष्यावर आधारित ‘छपाक’ या चित्रपटात दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. मालती हे तिच्या पात्राचे नाव आहे.   जेव्हा दीपिकाला ट्रेलरविषयी बोलण्यात सांगण्यात आले तेव्हा तिला रडू कोसळलं. यावेळी दीपिका म्हणाली, “काही चित्रपट स्वीकारताना त्याची संपूर्ण कथा आम्ही वाचतो, समजून घेतो. पण मेघना जेव्हा माझ्याकडे छपाकची कथा घेऊन आली, तेव्हा त्याची पहिली एक-दोन पानं वाचून मी लगेच होकार दिला. ही कथा मला पडद्यावर साकारायची होती आणि त्यात मेघना गुलजारचं मोठं श्रेय आहे. हा चित्रपट माझ्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असेल. आम्ही हा चित्रपट अतिशय जबाबदारीने बनवला आहे.” ‘छपाक’मधील लक्ष्मीची भूमिका साकारतानाच आलेला अनुभव मी आधी कधीच अनुभवला नसल्याचेही दीपिका यावेळी म्हणाली.  ट्रेलर लाँचला दीपिकासह दिग्दर्शिका मेघना गुलजार, अभिनेता विक्रांत मेस्सी आणि निर्माते उपस्थित होते. 10 जानेवारी 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...