• Home
  • Gossip
  • Deepika's Foundation launches lecture series on Mental Health, saying 'It will take time to raise awareness'

बॉलिवूड / दीपिकाच्या फाउंडेशनने सुरु केली मेंटल हेल्थवर लेक्चर सीरीज, म्हणाली - 'जागरुकता आणण्यात वेळ लागेल' 

दीपिकाने 2015 मध्ये सुरु केले होते 'लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशन'

दिव्य मराठी वेब

Sep 17,2019 02:20:34 PM IST

बॉलिवूड डेस्क : दीपिका पदुकोण रविवारी दिल्लीमध्ये होती. जिथे तिचा एनजीओ लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशनच्या वतीने मानसिक स्वास्थ्य विषयावर पहिल्यांदा लेक्चर सीरीजचे आयोजन केले गेले होते. याप्रसंगी मुख्य वक्ता म्हणून पद्मश्री सिद्धार्थ मुखर्जी यांनी व्याख्यान दिले. आयोजनामध्ये दीपिकाचे वडिल प्रकाश, आई उज्ज्वला आणि बहीण अनिशादेखील होती.


जागरुकता आणणे गरजेचे...
मेंटल हेल्थ विषयावर आपल्या आपल्या संघर्षाबद्दल बोलत दीपिका म्हणाली, "मला वाटते आता याबद्दल बोलायला सुरुवात झाली आहे. आता तसा स्टिग्मा राहिला नाही जसा चार वर्षांपूर्वी होता. निश्चितपणे आपल्याला जागरूकता आणण्याचा एक मोठा एक मार्गक्रमण करायचा आहे आणि यासाठी आपल्याला ही चर्चा सुरूच ठेवावी लागेल.'


प्रत्येकासाठी खुली आहे ही सीरीज...
दीपिकाने आपली ही लेक्चर सीरीज प्रत्येकासाठी ओपन असल्याचे सांगितले. ती म्हणाली की, ही जगातील प्रत्येक कोपऱ्यातल्या लोकांसाठी उपलब्ध आहे. विशेषतः त्या लोकांसाठी जे या फील्डमध्ये काम करण्यासाठी उत्साहित आहेत आणि आपला प्रवास - अनुभव सांगू इच्छितात.


2015 मध्ये सुरु केले होते फाउंडेशन...
दीपिका पदुकाेण अनेकदा आपल्या त्या अवस्थेबद्दल बोलली आहे, ज्यामध्ये तिने डिप्रेशनचा सामना केला होता. यातून बाहेर पडल्यावर 2015 मध्ये तिने लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशनची स्थापना केली होती.

X
COMMENT