आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DeepVeer Wedding Lehenga And Sherwani Making Video Out: Deepika Padukone Wedding And Reception Saree Ready In 7 Month Process And Cost In Lacks

दीपिका-रणवीरचे लग्नातील ड्रेस कसे बनले? 7 महिन्यांत तयार झाल्या दीपिकाच्या साड्या, अशी होती रंगाईपासून फायनल टचची प्रोसेस : VIDEO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दीपिका पदुकोण लग्नात अगदी टिपिकल ट्रेडिशनल ब्राइडल रुपात दिसली. इटलीतील लेक कोमो येथे झालेल्या कोंकणी पद्धतीच्या लग्नात दीपिकाने लाल कांजीवरम साडी परिधान केली होती, तर बंगळुरु येथे झालेल्या रिसेप्शनमध्ये ती गोल्डन मेटेलिक कांजीवरम साडीत दिसली होती. या दोन्ही साड्या दीपिकाला तिच्या आईने गिफ्ट केल्या होत्या. या दोन्ही साड्या बंगळुरुच्या प्रसिद्ध अंगादी गैलेरियाच्या अदवया कलेक्शनमधून सिलेक्ट करण्यात आल्या होत्या. दीपिकाच्या साड्यांवर उच्च प्रतिचे काम करण्यात आले होते. विशेष म्हणजे या दोन्ही साड्या तयार करण्यासाठी कारागिरांना सात महिन्यांचा कालावधी लागला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, लाल कांजीवरमचे जरी डिझाइन पूर्ण करण्यासाठी 4 महिने लागले होते. त्यावर कर्नाटकच्या दोन डोके असलेल्या एका पौराणिक चिमणीचे डिझाइन बनवले गेले होते. यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागला होता.

 

- दीपिकाने बंगळुरुच्या रिसेप्शनमध्ये परिधान केलेली मेटॅलिक गोल्डन कांजीवरम साडी परिधान केली होती, तिलादेखील बनवण्यासाठी सात महिने लागले होते. यामध्ये सॅम्पलिंगपासून ते  रॉ मेटेरियल, टेक्निकल इंटरवेंशनच्या काळाचा समावेश आहे.


50 हजारांपासून ते 3 लाख  आहे या साड्यांची किंमत... 

- अंगदी गैलेरिया बंगळुरुच्या हेरिटेज स्टोअरमधून लग्न आणि बंगळुरुत झालेल्या रिसेप्शनच्या साड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. अंगदी गैलेरिया गेल्या 600 वर्षांपासून साड्या बनवण्याचे काम करत आहे.
- सुत्रांच्या माहितीनुसार, या साड्यांवर सोन्याच्या जरीचे वर्क करण्यात आले होते. त्याची किंमत 50,000 ते 3 लाखांच्या घरात असते. साड्यांची किंमत कारागिरी आणि गोल्ड जरी वर्कवर अवलंबून असते. दीपिकाच्या दोन्ही साड्यांवर हेवी जरीचे काम करण्यात आले होते. त्यामुळे साहजिकच या साड्या अतिशय महागड्या होत्या. 

 

डिझायनरने शेअर केला दीपवीरने सिंधी पद्धतीने झालेल्या लग्नात परिधान केलेल्या कपड्यांचा मेकिंग व्हिडिओ...
- डिझायनर सब्यसाचीने अलीकडेच दीपवीरने सिंधी पद्धतीने झालेल्या लग्नात परिधान केलेल्या कपड्यांचा मेकिंग व्हिडिओ शेअर केला. यावरु दीपिकाचा  वेडिंग लहेंगा आणि रणवीरची शेरवानी बनवण्यासाठी कारागिरांना किती मेहनत घ्यावी लागली, याचा अंदाज येतो.
- दीपिका-रणवीरच्या लग्नाचे कपडे तयार करण्यासाठी एक एक मोती आणि धाग्यांची विचारपूर्वक निवड करण्यात आली. त्यानंतर डिझाइन कापडांवर चितारले गेले.  

बातम्या आणखी आहेत...