आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त, वेन्युच्या आजुबाजूला केली जातेय बोट पेट्रोलिंग, पाहुण्यांच्या हातात बांधले स्पेशल बँड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचे आज लग्न आहे. लेक कोमोमध्ये 14 नोव्हेंबर रोजी कोंकणी पध्दतीने तिचे लग्न होईल. कारण दीपिका साउथ इंडियन आहे. लग्नासाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. 


मोबाइल फोनवर बंदी 
लग्नात निवडक 30-40 लोक असणार आहेत. वेडिंग सेरेमनी दरम्यान कुणीही आपला मोबाइल आपल्या जवळ ठेवू नये अशी विनंती करण्यात आली आहे. कारण लग्नातील एकही फोटो लीक होऊ नये असे त्यांना वाटते. तर सर्व सिक्योरीटी गार्ड्सने कॅमेरा लेंसेसवर स्टिकर चिटकवले आहेत. यासोबतच एंट्रीच्या वेळी पाहुण्यांच्या हातात रिस्टबँड लावण्यात आले आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीची एंट्री होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे. लेकच्या आजुबाजूच्या परिसरात बोटने पेट्रोलिंग केली जात आहे. यासोबतच वेन्यूच्या आजुबाजूला ड्रोन घेऊन जाण्यास सख्त मनाई आहे.

 

लग्नात वातावरणामुळे येऊ शकतो अडथळा 
लेक कोमोमध्ये तापमान 13 डिग्री सेल्सियस आहे आणि पाऊस येण्याची शक्यता आहे. लग्नासाठी बुक केलेला बराच भाग हा ओपन आहे. अशा वेळी लग्नात काही अडचणी येऊ नये म्हणून दीपिका रणवीरने लेक कोमोच्या विलासोबतच जवळील एक विला बुक केला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...