Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Deer fall in well during water searching

पाण्याच्या शाेधात जळगाव शहरात आलेली हरिणी खदानीत काेसळली, ३ तासांनी बाहेर काढण्यात यश

प्रतिनिधी | Update - May 23, 2019, 09:10 AM IST

बचाव कार्यात दोन कर्मचारी जखमी

  • Deer fall in well  during water searching

    जळगाव -अन्न-पाण्याच्या शोधात थेट शहरात शिरलेली एक हरिणी मंगळवारी दुपारी १ वाजता जळगाव खोटेनगर परिसरातील खोल खदानीत पडली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकासह वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी तीन तास अथक प्रयत्न करून अखेर या हरिणीला बाहेर काढले. आधी पथकातील कर्मचाऱ्यांनी खदानीत शिडी टाकली. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खाली उतरून दलदलीत अडकून बसलेल्या हरिणीला दोरी बांधून वर खेचण्याचा प्रयत्न केला. सुमारे ३ तासांच्या प्रयत्नानंतर हरिणीला बाहेर काढण्यात यश आले. या प्रयत्नात महापालिकेचे देविदास सीताराम सुरवाडे व प्रकाश धर्मा चव्हाण हे दोन कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Trending