Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | deer hunting for party, party photos viral on social media, two people arrested

पार्टीसाठी केली हरणाची शिकार, पार्टीपूर्वीचा फाेटाे वायरल; दोघे जण पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी, | Update - Jul 12, 2019, 09:00 AM IST

हरणाचे मांस पार्टीसाठी कापत असल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल

  • deer hunting for party, party photos viral on social media, two people arrested

    वैजापूर - हरणाची शिकार करुन वस्तीवर झणझणीत मेजवानी बेत आखण्याची जोरदार तयारी करणाऱ्या पाच जणांचा वीरगाव पोलिस पथकाने येथे अचानक छापा टाकल्याने मेजवानीचा हिरमोड झाला. पोलिस पथकाने टाकलेल्या छाप्यात मेजवानी साठी हत्या केलेल्या हरणाचे मांस जप्त करुन दोन जणांना या प्रकरणी ताब्यात घेतले.


    हनुमंतगाव शिवारातील त्रिभुवन वस्ती येथे सायंकाळच्या सुमारास काही तरुण हरणाचे मांस पार्टीसाठी कापत असल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यांची माहिती वीरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष बोऱ्हाडे यांना कळल्या नंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक ए.जी.नागटिळक, हवालदार खंडू मोरे, दिपक बर्डे, गणेश जाधव यांच्या पथकाने भेट देऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी हरणाचे मांस कापून पडलेल्या अवस्थेत आढळून आले.दरम्यान पोलीस आल्याने मेजवानीची जय्यत तयारी करणा-या पाच जणांपैकी वीरगाव पोलीसांनी संजय बाबुराव ञिभुवन, गुलाब बाळासाहेब फुलारे या दोघांना ताब्यात घेतले. तर नानासाहेब सोपान परडे, सचिन अशोक ञिभुवन, रवी एकनाथ ञिभुवन हे तिघे पसार झाले.
    दरम्यान वनपरिक्षेत्र विभागाचे वनरक्षक बाळासाहेब चव्हाण घटनास्थळी दाखल झाले असून मृत हरणाचा पंचनामा त्यांनी सुरु केला राञी उशिरापर्यंत या प्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती. वन्य प्राण्यांची हत्या किंवा शिकार न करता त्यांचे संरक्षण करावे असे आवाहन वीरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष बोऱ्हाडे यांनी केले आहे.

Trending