आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदाकाठच्या शेतात हरीण, डुकरांचा धुडगूस;  शेती उद्ध्वस्त  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजय कुलकर्णी / संदीप दाभाडे 

अंबड / परतूर - राज्यातील अनेक  गावांच्या  शिवारात  हरीण, रानडुक्कर, वानर, रोही अशा वन्य प्राण्यांचा सुळसुळाट झाला आहे. या वन्य प्राण्यांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत. मान्सूनोत्तर पावसाने खरिपाचे पीक पाण्यात गेले. त्यातून वाचलेल्या िपकावर आता रानडुक्कर, हरणे, वानरं आणि रोही ताव मारत आहेत. शेताशेतात या वन्य प्राण्यांनी धुडगूस घातला आहे. नदीकाठच्या शेतात रानडुकरे आणि हरणांचे कळप उभी पिके, पिकांच्या राशी, पेरा झालेली पिके यावर ताव मारताहेत. गोदाकाठच्या सुमारे २०० गावांत या वन्य प्राण्यांमुळे होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे हल्ले

रानडुकरे शेतकऱ्यांवर हल्ले करत आहेत. जांब समर्थ येथील शेतकरी रामराव तांगडे यांच्यावर डुकराने हल्ला केला. त्यात रामराव यांच्या गळ्याला जखम झाली असून त्यांना ३२ टाके पडले आहेत. घाणेगावचे शेतकरी लहू साबळे यांचा पाय रानडुकराच्या हल्ल्यात जायबंदी झाला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...