आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०१७ ला केला होता विनयभंग आता २०१९ मध्येही विद्यार्थिनीची केली बदनामी; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - २०१७ मध्ये कोचिंग क्लासेसमध्ये असलेल्या बारावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला. यानंतर आता २०१९ मध्येही त्या मुलीच्या मित्र-मैत्रिणीमध्ये ती पळून गेली, तिची वर्तणूक चांगली नाही, असे म्हणत बदनामी करणाऱ्या शिक्षकाविरुध्द मुलीच्या तक्रारीवरुन सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन बाबूराव पवार (चौधरीनगर, जालना) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार मुलगी ही मोहन पवार यांच्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकण्यासाठी होती. पवार यांनी तिला फोनवर व मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले होते. या त्रासाबाबत सदर मुलीने एक व्हिडिओ यू-ट्युबवर अपलोड करुन झालेल्या त्रासाची  माहिती दिली होती. 
त्यावेळीही त्या मुलीने ठाण्यात तक्रार दिली होती, परंतु नंतर पवार यांनी माफी मागितल्यामुळे हा अर्ज मागे घेतला होता. परंतु यानंतरही त्या मुलीच्या मित्र, मैत्रिणीजवळ पवार हे ती कुणासोबत पळून गेली आहे, तिचे वर्तन चांगले नाही, असे सांगून बदनामी करीत आहेत. याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरुन सदर बाजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या प्रकरणातील तक्रारदार मुलगी ही घरगुती ताणामुळे आई-वडिलांपासून वेगळी राहते. ती अंबड येथील एका इंग्लिश शाळेवर नोकरी करत वेगळी राहते.