आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित बहुजन आघाडीने राज्यात नुकसान केले : अशोक चव्हाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने धर्मनिरपेक्ष विचारधारेचे नुकसान करून जातीयवादी पक्षांना मदत केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीमुळेच अनेक मतदारसंघांत काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना अपयश पत्करावे लागल्याचा ठपका त्यांनी ठेवला. स्वत:च्या आणि राज्यातील काँग्रेसच्या कामगिरीच्या पराभवाची आपण जबाबदारी स्वीकारत असल्याचे ते म्हणाले. मात्र, काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असेही ते म्हणाले. चव्हाणांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत राज्यात काँग्रेसची दैना उडाली आहे. नांदेडच्या आपल्या स्वत:च्या जागेवरही चव्हाण यांचा पराभव झाला आहे. 


या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यासाठी वंचित बहुजन आघाडीकडे बोट दाखवले आहे. आपण लोकांचे प्रश्न मांडले, त्यांच्यासाठी रस्त्यावर संघर्ष केला, तरीही निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागल्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. भविष्यात पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असेही ते म्हणाले.