छोट्या-छोट्या पाच चुका, / छोट्या-छोट्या पाच चुका, ज्यामुळे वाढत जाते दुर्भाग्य आणि ग्रह दोष

Aug 29,2018 01:00:00 PM IST

आपल्या दैनंदिन जीवनात आपण रोज अशा काही चुका करतो ज्यामुळे ग्रहांचे दोष वाढतात. यामुळे जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते. या चुका छोट्याच असतात परंतु याचा वाईट प्रभाव दीर्घकाळापर्यंत राहतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, कोणत्या आहेत अशा पाच चुका ज्यामुळे ग्रहांचे दोष वाढतात...


1. दूध कधीही उघडे ठेवू नये
ज्योतिष शास्त्रानुसार, दूध चंद्राशी संबंधित आहे. दूध उघडे ठेवल्यास चंद्राचे दोष वाढतात. यामुळे घरातील महिलांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होते. दूध गरम असल्यास जाळीच्या झाकणाने झाकून ठेवावे परंतु पूर्णपणे उघडे ठेवू नये.


2. देवघर नेहमी स्वच्छ ठेवावे
घरातील देवघराची नियमीतपणे स्वच्छता करावी. असे न केल्यास गुरु ग्रहाशी संबंधित दोष वाढतात. यामुळे लग्न जमण्यास उशीर होतो. अभ्यासाशी संबंधित समस्या निर्माण होतात.


3. चप्पल-बूट किचनपर्यंत घेऊन जाऊ नये
काही लोक घरात चप्पल-बूट घालून प्रवेश करतात फक्त प्रवेशच करत नाहीत तर किचनपर्यंत चप्पल-बूट घालून जातात. यामुळे शनीशी संबंधित दोष वसतात आणि विविध आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

4. बाथरूम अस्वच्छ ठेवणे काही लोक बाथरूमच्या स्वच्छतेकडे अजिबात लक्ष देत नाहीत. बाथरूम वेळच्या वेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे. असे न केल्यास राहूचे दोष वाढतात. यामुळे व्यक्तीला वाईट सवयीला बळी पडू शकतो.5. सकाळी उशिरा उठणे आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपणे काही लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात. यामुळे सूर्याशी संबंधित दोष वाढतात. या व्यतिरिक्त सूर्यास्ताच्या वेळी झोपल्याने सूर्याचे अशुभ फळ प्राप्त होतात. यामुळे डोळ्याशी संबंधित आजार होऊ शकतात.
X