आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Defense Expo 2020: India's Position In Defense Will Rise

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिफेन्स एक्स्पो 2020 : संरक्षणात भारताचा दबदबा वाढणार

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
पायदळ : भारतीय सैन्याच्या बॅटल टँक टीमनेही अद्भुत क्षमतेचे घडवले दर्शन - Divya Marathi
पायदळ : भारतीय सैन्याच्या बॅटल टँक टीमनेही अद्भुत क्षमतेचे घडवले दर्शन
  • पायदळ : भारतीय सैन्याच्या बॅटल टँक टीमनेही अद्भुत क्षमतेचे घडवले दर्शन
  • जल: गाेमतीमध्ये तटरक्षक दलाचे स्कूटर, जवानांनीही केल्या कसरती
  • हवाई : सुखाेईने केल्या आकाशात गर्जनेसह थरारक कसरती

लखनऊ - आशियातील सर्वात माेठ्या संरक्षणविषयक प्रदर्शनाला बुधवारपासून सुरुवात हाेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन हाेणार आहे. प्रदर्शनात ७० देशांतील १६५ कंपन्या शस्त्रास्त्र सादर करतील. थायलंडचे पंतप्रधान प्रत्युत चान यांच्यासह २५ देशांचे संरक्षण मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी हाेतील. त्याचबराेबर अनेक देशांचे लष्करप्रमुख आपल्या दलासह सहभागी हाेतील. चीन व पाकिस्तान त्यात सहभागी नसेल. पायदळ, नाैदल व हवाई दलाने सराव सुरू केला आहे. एक्स्पाे ९ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. ८ व ९ फेब्रुवारी राेजी हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. 
२० हजार काेटी रुपयांच्या गुंतवणुकीची अपेक्षा : प्रदर्शनाची संकल्पना ‘भारत : संरक्षणातील उदयाेन्मुख हब’ अशी ठेवण्यात आली आहे. प्रदर्शनात अमेरिका, ब्रिटन, ब्राझील व नाॅर्वेसह इतर देशांचे सैन्य अवजारे उत्पादक कंपन्याही सहभागी हाेतील. भारतात सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी देखील नाेंदणी केली आहे. प्रदर्शनात ५४ देशांत तयार व सुट्या भागांच्या खरेदीसाठी सामंजस्य करार हाेणे अपेक्षित आहे. इस्रायलने २० प्रतिनिधींची टीम पाठवली आहे. सुमारे २० हजार काेटी रुपयांच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे. एफ-३५ लढाऊ विमान, सी-२९५ जेटचेही दर्शन


प्रदर्शनात पहिल्यांदाच अमेरिकेतील एअराेस्पेस कंपनी लाॅकहीड मार्टीनचे आधुनिक एफ-३५ लढाऊ जेट पाहायला मिळेल. युराेपीयन कंपनी एअरबस सी-२९५ विमान असेल. त्याशिवाय एएस एमबीई ५६५ पँथर विमान, एच-१४५ एम व एच २२५ एम हेलिकाॅप्टरही दिसेल. दुसरीकडे भारताचे तेजस, एअरबाेर्न अर्ली वाॅर्निंग अँड कन्ट्राेल सिस्टिम, मानवरहित ड्राेन रुस्तुमसह अॅडव्हान्स्ड पायलटलेस टार्गेट एअरक्राफ्ट लक्ष्य-२, हेवी ड्राॅप सिस्टिम, निर्भय हे क्षेपणास्त्र देखील प्रदर्शनात मांडले जाईल. तेजस मार्क-८२, तेजस मार्क-१ ए व कावेरी इंजिनचे माॅडेलही दिसून येईल. इनपूट : आदित्य तिवारी.