आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - आशियातील सर्वात मोठ्या संरक्षण प्रदर्शनाला बुधवारी लखनऊमध्ये सुरुवात झाली. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात देश-विदेशातील अत्याधुनिक आयुुधे व संरक्षणविषयक तंत्रज्ञान मांडण्यात आले आहे. प्रदर्शनात सादर करण्यात आलेले दक्ष डिफ्यूजरमध्ये बाँबला दोन किलोमीटर अंतरावरून रिमोटने संचलित केले जाऊ शकते. तो एवढ्या अंतरावरून निष्क्रिय करणे शक्य होणार आहे.
संरक्षण क्षेत्रात भारताची शक्ती..
एक्स्पोमध्ये संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताची कामगिरी व उत्पादनांना मांडण्यात आले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया...
उद्दिष्ट : पाच वर्षांत निर्यातीचे ३५ हजार कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवलेय : मोदी
आमचा एकच मंत्र आहे. मेक इन इंडिया. २०१४ मध्ये भारत २ हजार काेटींची आयुधे िनर्यात करत हाेता. आता गेल्या दाेन वर्षांत भारताने १७ हजार काेटी रुपयांच्या निर्यातीचा पल्ला गाठला आहे. आगामी पाच वर्षांत ५ अब्ज डाॅलर्सचा निर्यातीचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच सुमारे ३५ हजार काेटी रुपयांची ही िनर्यात असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
कामगिरी : तिन्ही दलांच्या जवानांच्या कसरतींचे दर्शन, सामान्य लोकांसाठीही स्पर्धा
एक्स्पोमध्ये नौदलाच्या जवानांनी चित्तथरारक कसरती दाखवल्या. जवानांनी कधी जहाजातून उडी घेतली तर कधी पाण्यात आघाडी सांभाळली. पायदळ सैन्याने तोफांच्या साह्याने क्षमता दाखवली. हवाई दलाच्या जवानांनी एअर शोमध्ये करामती दाखवल्या. गोमती रिव्हर फ्रंटवर स्पर्धांचे आयोजन केले जाईल. त्यात ऑब्सटेकस कोर्स, रेफ्लेक्स फायरिंग, एनबीसी सूट, क्विझ इत्यादीचा समावेश आहे.
करार : २०० हून जास्त सामंजस्य करार, डिफेन्स कॉरिडोरलाही मिळणार लाभ
एक्स्पोमध्ये २०० हून जास्त एमआेयू होणे अपेक्षित आहे. २०१८ मध्ये चेन्नईत झालेल्या संरक्षण प्रदर्शनाच्या पाच पटीने मोठे आहे. रशियाच्या एअरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात १० सामंजस्य करार होतील. त्याचा मोठा लाभ डिफेन्स कॉरिडोरसाठी होईल. बुधवारी एचएएलने इस्रायलच्या फर्मसोबत ड्रोन बनवणे, व्यापाराबाबत सामंजस्य करार केला. त्याचा लाभ यूएव्ही क्षेत्रास होईल.
दक्ष : डिफ्यूज केल्यानंतर बाॅम्बला उचलून दूर नेते
रिमोट बटण दाबताच दक्ष अनेक छिद्रे करून बाॅम्बची क्षमता कमी करतो. रोबॉटिक सिस्टिमने निष्क्रिय बाॅम्बला दूर घेऊन जाते.
रिप मूग वेपन : ३६० अंशात गोळीबार करणे शक्य
ब्रिटनच्या या आयुधाला सेन्सर लावलेले आहेत. त्याद्वारे निगराणी सहज होते. १२.७ एमएमच्या गनला ३६० अंशापर्यंत फिरवून लक्ष्य टिपता येते.
टायफून : गोळीबाराबरोबर बाॅम्बगोळ्यांचा वर्षाव
इस्रायलमध्ये निर्मित टायफून दिवस-रात्र निशाणा साधतो. त्याचे ग्रेनेड लाँचर २३० फैरी व गोळे डागू शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.