आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये महिनाभरात डिफेन्स इनाेव्हेशन हब; संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- डिफेन्स इनाेव्हेशन हब नाशिकमध्ये हाेणार असून त्यासंदर्भातील घाेेषणा अाणि अंमलबजावणी एका महिन्यात हाेईल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनी दिली. तीन महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये असा क्लस्टर हाेणार अशी माहिती त्यांनी दिली हाेती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नागपूरला डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हबला मंजुरी दिल्यानंतर नाशिकहून हा हब नागपूरला पळविल्याचा राेष पहायला मिळत हाेता. याच पार्श्वभूमीवर त्यांनी डिफेन्स इनाेव्हेशन हब नाशकातच हाेणार असल्याचे स्पष्ट केले अाहे. डाॅ. भामरे यांनी साेमवारी 'दिव्य मराठी'च्या कार्यालयास भेट दिली. 


देशात लघू उद्याेजकांना संरक्षण क्षेत्रातून प्राेत्साहन मिळावे, त्यांच्या माध्यमातून डिफेन्स इकाे सिस्टिम तयार व्हावी यासाठी केंद्राने अतिशय महत्त्वाकांक्षी असा डिफेन्स इनाेव्हेशन हब वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी काेर्इमतूर येथे डिफेन्स इनाेव्हेशन हब देण्याची घाेषणा केली हाेती. दुसरा हब नाशिकमध्ये होण्यासाठी अापण पंतप्रधानांना अाणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांना साकडे घातले व त्यांनी मान्यही केले. मुख्यमंत्र्यांचेही सहकार्य यासाठी लाभल्याची माहिती त्यांनी दिली. नाशिकमधील डाॅ. प्रशांत पाटील हे सुद्धा याप्रकरणी पाठपुरावा करत अाहेत. 


यांना मिळेल सुविधा, निधी

डिफेन्स इनाेव्हेशन हबच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात लघुउद्याेजक, डिफेन्स इंडस्ट्रीज, वैयक्तिक संशाेधक, स्टार्टअप, अकॅडमी यांना संशाेधन अाणि विकासासाठी प्रस्तावित करून त्यांना पायाभूत सुविधा व निधीही उपलब्ध करून दिला जाणार अाहे. 


हवाईदलाचे प्रशिक्षण केंद्रही नाशिकमध्ये राहणार
सध्या नाशिकमध्ये असलेले हवाईदलाचे प्रशिक्षण केंद्र दुसरीकडे हलविण्याची चर्चा सुरू असून तिचे जाेरदार खंडन डाॅ. भामरे यांनी केले. हे केंद्र हलविण्याबाबतचा कुठलाही प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे नाही. त्यामुळे हे केंद्र नाशिकमध्येच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


डीएमअायसी दुसऱ्या टप्प्यात धुळ्याचा समावेश
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडाॅरच्या दुसऱ्या टप्प्यात धुळ्याचा समावेश असल्याची माहिती डाॅ. भामरे यांनी दिली. धुळे जिल्ह्यात मुंबई-अाग्रा, नागपूर-सुरत, धुळे-बीड महामार्ग (यात कन्नड घाटात १२ किलाेमीटरचा सर्वात माेठा बाेगदा असेल), अाैरंगाबाद-चाळीसगाव, साेनगीर-अंंकलेश्वर असे सात राष्ट्रीय महामार्ग असल्याने कनेक्टिव्हिटी उत्तम झाल्याचा दावाही त्यांनी केला. मतदारसंघातील सुरवाडे-जामफळ येथील पाचवी पाणीपुरवठा याेजना मार्गी लागल्याने १०० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार अाहे. प्रधानमंत्री कार्यालयाकडून विशेष बाब म्हणून हा प्रकल्प मार्गी लावून घेतल्याचे त्यांनी सांगितले. 


नार-पारसाठी गुजरातसाेबत हाेणार सामंजस्य करार 
'नार-पार' याेजनेच्या सर्वेक्षणासाठी १४ काेटी रुपये मंजूर करण्यात अालेले असून गुजरातबराेबर सामंजस्य करार केला जार्इल. मांजरपाडा-२ हा प्रकल्प यातून साकारला जाणार असून पाच हजार काेटींचा हा प्रकल्प असेल. त्याचबराेबर ४० हजार काेटींचा, पाच नद्या जाेडणारा नदीजाेड प्रकल्पही मार्गी लागणार अाहे. ज्यामुळे अनेक तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न मिटेल याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

बातम्या आणखी आहेत...