आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राफेलची पहिली खेप घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंह फ्रान्सला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस : संरक्षणमंत्री राजनाथसिंह अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त लढाऊ विमान राफेलची चार विमानांची पहिली खेप आणण्यासाठी फ्रान्सची राजधानी पॅरिस भेट देणार आहेत. हे लढाऊ विमान मिटिऑर व स्कॅल्प क्षेपणास्त्रांनी सज्ज असल्यामुळे शत्रूसाठी अतिशय मारक स्वरूपाचे आहे, असा दावा युरोपातील क्षेपणास्त्र कंपनी एमबीडीएने केला आहे.

या क्षेपणास्त्रांमुळे भारताकडे लांब पल्ल्याचे लक्ष्य उद्ध्वस्त करण्याची क्षमता निर्माण होणार आहे. मिटिऑर व व्हिज्युअल रेंज क्षेपणास्त्राच्या पातळीवर हे जगात सर्वाधिक मारक मानले जाते. त्याशिवाय स्कॅल्प प्रचंड खोलपर्यंत हल्ला करण्यात सक्षम आहे. ही खेप भारतात पोहोचल्यानंतर देश हवाई क्षेत्रात आशियातील बळकट देश म्हणून उदयाला येईल. ही दोन्ही क्षेपणास्त्रे राफेल लढाऊ विमानाचे महत्त्वाचे आकर्षण ठरतात.

एमबीडीएचे भारताचे प्रमुख लुइक पिडेवाशे म्हणाले, भारताला राफेलमुळे नवीन क्षमता मिळेल. आतापर्यंत देशाकडे ही क्षमता नव्हती. स्कॅल्प व मिटिऑर क्षेपणास्त्रे भारतीय हवाई दलासाठी गेमचेंजर म्हणून सिद्ध होतील. दुसरीकडे भारताने सामरिक आघाडीला बळकट करण्यासाठी फ्रान्सची कंपनी डॅसो एव्हिएशनसोबत तीन वर्षांपूर्वी पहिला करार केला होता. त्याअंतर्गत भारताला ५९ हजार कोटी रुपयांमध्ये ३६ राफेल विमाने मिळतील. गेल्या आठवड्यात हवाई दल प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एअरचीफ मार्शल आर.के. एस. भदौरिया यांनी ८ ऑक्टोबरला भारताला राफेल मिळणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु लष्करी आघाडीवर सज्ज करण्यासाठी विमाने तूर्त फ्रान्समध्ये ठेवली जातील. ही चार विमाने पुढील वर्षी मेमध्ये भारतात येतील आणि हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होतील.

सर्जिकलमध्ये महत्त्वाचे
मिटिऑर हवेतील कोणत्याही हल्ल्यास रोखण्यात सक्षम आहे. हे नेक्स्ट जनरेशनचे क्षेपणास्त्र आहे, असे ल्यूकस यांनी सांगितले. एमबीडीएने ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स, स्पेन व स्वीडन यांच्या मागणीनुसार ते तयार केले आहे. हे क्षेपणास्त्र अॅडव्हान्स रडारद्वारे नियंत्रित केले जाते. कोणत्याही वातावरणात राफेल लढाऊ विमान तसेच मानवरहित विमानांना उद्ध्वस्त करू शकते. सर्जिकल स्ट्राइकच्या दृष्टीने आखल्या जाणाऱ्या मोहिमांत ते अत्यंत प्रभावीपणे व सहज काम करते.

फ्रान्समध्ये पहिल्या महायुद्धातील शहीद भारतीयांचे स्मरण, लष्करी संचलनाद्वारे श्रद्धांजली

पॅरिस : पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृतीत फ्रान्सच्या गुइसलॅन इंडियन वॉर मेमोरियलमध्ये एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लष्कराने श्रद्धांजली अर्पण केली. पहिल्या महायुद्धात १० लाखांहून जास्त भारतीय सैनिकांना इतर देशांसोबत लढण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यात एकूण ७८ हजार १८७ जवान शहीद झाले होते. पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिक जर्मन साम्राज्याच्या विरोधात पश्चिमेकडील आघाडीसोबत होते. तेव्हा भारतीय सैनिकांनी तत्कालीन सरकारसाठी परदेशात मोहिम राबवली होती.
 

बातम्या आणखी आहेत...