आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेकडून 73 हजार सिग सॉवर रायफल खरेदीला मंजुरी, 2020 पर्यंत जवानांना मिळणार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी सांगितले की, आठडाभरात या डीलला अंतिम स्वरुप दिले जाईल. 
  • जवानांकडे असलेल्या इंसास रायफलच्या जागी त्यांना या रायफल दिल्या जाणार आहे. 

नवी दिल्ली - चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांना अमेरिकेत तयार केल्या जाणाऱ्या अत्याधुनिक रायफल मिळणार आहेत. शनिवारी संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेकडून 73 हजार सिग सॉवर रायफल खरेदी करण्याच्या प्रस्तावा मंजुरी दिली. हा प्रस्ताव दीर्घकाळापासून प्रलंबित होता. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या वर्षीपर्यंत या रायफल जवानांच्या हातात येतील. त्यांना इंसास रायफलऐवजी या रायफल्स दिल्या जातील. 


अमेरिकेसह अनेक देशांच्या लष्कराकडे आहेत सिग सॉवर
न्यूज एजन्सीतील सुत्रांच्या माहितीनुसार संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी सिग सॉवर रायफल खरेदी प्रकरणाला हिरवी झेंडी दाखवली आहे. अशाच रायफलींचा वापर अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांच्या लष्कराकडून केला जातो. 


रायफल खरेदीच्या व्यवहाराशी संबंधित सुत्राने सांगितले की, आठवडाभरात हा व्यवहार पूर्ण होणार आहे. एका वर्षाच्या आत अमेरिका भारताला या रायफल देणार आहे. 


ऑक्टोबर 2017 मध्ये लष्कराने 7 लाख रायफल, 44,000 लाइट मशीन गन (एलएमजी) आणि  44,660 कारबाइन खरेदीची प्रक्रिया सुरू केली होती. 


स्वदेशी रायफल फायरिंग टेस्टमध्ये झाली होती फेल 
सुमारे 18 महिन्यांपूर्वी लष्कराने स्वदेशी असॉल्ट रायफलला नकार दिला होता. त्याचे कारण म्हणजे ही रायफल फायरिंग टेस्ट पास करू शकली नव्हती. त्यानंतर लष्कराने विदेशी कंपन्यांकडून रायफल खरेदीची मागणी केली होती. 

बातम्या आणखी आहेत...