आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dehradun Uttarakhand News: A Old Man Died While Dancing.his Death Video Gone Viral On Facebook

Death Video: मुलीच्या लग्नात नाचत होते वडील, अचानक आला मृत्यू; व्हिडिओत कैद झाली संपूर्ण घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - नाचत-गात मृत्यूमुखी पडलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक लग्नसमारंभ दाखवण्यात आला. काहींच्या मते, ते आपल्या मुलीच्या लग्नात नाचत होते. त्यांना प्रतिसाद देताना कुटुंबातील काही महिलांनी सुद्धा स्टेजवर येऊन आपल्या स्टेप्स दाखवल्या. सगळेच हसत-हसत एन्जॉय करत होते. एक-एक करून महिला त्यांच्यासोबत डान्स करण्यासाठी येत होत्या. याच दरम्यान अचानक त्या व्यक्तीला हृदय विकाराचा धक्का बसला. डान्स करताना अचानक ते बाजूला जाऊन बसले आणि तेथेच कोसळले. 


हा व्हिडिओ उत्तराखंडच्या एका लग्नसमारंभातील आहे असे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्यक्तीचे नाव अजुनही कळाले नाही. परंतु, हा व्हिडिओ जवळपास दोन महिने जुना आहे. वयोवृद्ध व्यक्ती आपल्या मुलीच्या लग्नात डान्स करत होते. स्टेजवर गेलेल्या वडिलांना पाहून खाली पाहुणे त्यांना चिअर करत होते. काही महिलांनी त्यांच्या सोबतीला येऊन आपल्या कला सादर केल्या. अवघ्या काही मिनिटांत ती व्यक्ती बाजूला जाऊन बसली आणि वेळीच कोसळली. अचानक हे काय घडते आहे कुणाला कळलेच नाही. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांना मृत्यू झाला. कुटुंबियांत लग्नाच्या घरात हा प्रकार घडल्याने सगळेच शॉक होते. परंतु, सोशल मीडियावर लोक ही पोस्ट शेअर करताना आपलाही मृत्यू असाच हसत-खेळत आणि नाचत-गात व्हावा अशा पोस्ट लिहित आहेत. त्यातही अनेक जण त्या व्यक्तीला नशीबवान म्हणत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...