आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत आपच्या एका नेत्याने केली युवकास मारहाण, कपडे उतरवून पोलिसांच्याच काठीने मारले, सगळीकडे व्हायरल होत आहे हा व्हिडीओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/ नवी दिल्ली : आम आदमी पार्टी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे आणि यावेळी एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे ही पार्टी वादात अडकली आहे. हा व्हिडीओ झपाट्याने सगळीकडे व्हायराल होत आहे. या व्हिडिओमध्ये आम आदमी पार्टीचा नेता एका मुलाला काठीने बेदम मारताना दिसत आहे. त्याठिकाणी पोलिसही हजर होते पण कुणीही त्या नेत्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. 

 

नेमके काय होते प्रकरण.. 
- सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ 14 नोव्हेंबरच आहे. दिल्ली येथील किराडी या भागातील आहे. मारहाण करणाऱ्या या नेत्याचे नाव सौरव झा असे आहे आणि तो पार्टीच्या पूर्वी यूपी फ्रंटचा लीडर आहे. मारहाण झालेल्या युवकाचे नाव विकास आहे. 
- मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार विकासच्या भावावर दोन वर्षांपूर्वी सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. विकासचे म्हणणे आहे की, त्या गुन्ह्याबद्दलची केस बंद करण्यासाठी सौरव झाने त्यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपये मागितले होते पण त्याच्या कुटुंबाने पैसे देण्यास नकार दिला.
- विकासच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, सौरव झा पैसे न दिल्यामुळे चिडला होता. 14 तारखेला त्याने गर्दीत महिलांना छेडल्याचा आरोप लावत विकासला मारहाण केली.  
- दुसरीकडे सौरव झाने सांगितले की, विकास आणि त्याचे मित्र सतत आसपासच्या लोकांना त्रास देत असतात. म्हणून चिडून त्याने विकासला मारले. सौरव झाच्या म्हणण्यानुसार विकास आणि त्याच्या भावावर कित्तेक महिलांना त्रास दिल्याचे गुन्हे दाखल आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...